29 April, 2022

 


रेशीम शेतीबाबत तांत्रिक प्रशिक्षण संपन्न

 

हिंगोली, दि. 29  (जिमाका) :  एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हिंगोली आणि जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांचे रेशीम शेतीबाबत निवासी तांत्रिक प्रशिक्षण संपन्न झाले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीपूरक जोडधंदा म्हणून रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून सन 2022-23 पासून रेशीम शेती करण्यास इच्छूक असलेल्या शेतकऱ्यांना हिंगोली येथील एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत रेशीम शेतीचे संपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्ह्यातील 04 गावातील 13 शेतकऱ्यांना दि. 20 एप्रिल ते 29 एप्रिल, 2022 या कालावधीत‍ रेशीम शेतीविषयी निवासी तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचाच भाग म्हणून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष स्थळ भेटीसाठी पांगरा शिंदे येथे दि. 25 एप्रिल, 2022 रोजी नेण्यात आले होते. तसेच दि. 29 एप्रिल, 2022 रोजी लेखी व मौखिक परीक्षा घेण्यात येऊन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

आज प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, संचालक धनाजी बोईले, परीक्षक सोनूने तसेच विजय खिल्लारे, संगीता मुळे, सर्व प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बोखारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक वडवळे, रमेश भवर, नितीन लोलगे, रजनीश कुटे, तानाजी परघणे, प्रितेश रटनाळू यांनी परिश्रम घेतले.

*****

No comments: