पोस्ट ऑफिस
करणार आता ‘ई-पेमेंट’ने व्यवहार
हिंगोली, (जिमाका) दि. 28 : टपाल विभागाने डिजिटल मार्ग
स्वीकारण्यास सुरवात केली आहे. त्यातच आता डिजिटल पेमेंटची भर पडली आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिस मध्ये देखील डिजिटल पेमेंट करता येणार आहे.
परभणी विभागातील 37 पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
सध्या विविध शासकीय यंत्रणांनी ऑनलाईनचा
स्वीकार केला असून बहुतांश शासकीय कामे, शुल्क भरणे एका क्लिकवर होते. त्यात आता
टपाल खाते सुद्धा मागे राहिले नाही. त्यामुळे नागरिकांना आता पोस्ट ऑफिसमध्ये
देखील रोख बाळगायची गरज भासणार नाही.
नागरिकांना मनी ऑर्डर, पार्सल बुकींग,
स्पीड पोस्ट, रजिस्टर आदीचे शुल्क आता ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर देता
येणार असल्याचे परभणी विभागाचे डाकघर अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment