13 April, 2022

सुशिक्षित बेरोजगारांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 

सुशिक्षित बेरोजगारांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

 या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका) दि.13: जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बेरोजगारांना उत्पादन उद्योग व सेवा उद्योगासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना गत तीन वर्षांपासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सेवा उद्योगासाठी रु.10 लाख च्या मर्यादेपर्यंत व उत्पादन उद्योगासाठी रु. 50 लक्ष पर्यंत बँकेमार्फत अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत या कार्यालयाकडून बँकेच्या कर्ज मंजूरीनंतर 15 टक्के ते 35 टक्के पर्यंत जार्त प्रवर्ग/ उद्योग कार्यक्षेत्रानुसार अनुदान देय आहे.

            जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारानी उद्योगासाठी ऑनलाईन अर्ज maha-cmegp.gov.in  या संकेतस्थळावर करावे. यासाठी आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड,फोटो, पॅनकार्ड, प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गासाठी), टी.सी., अंडर टेकींग फॉर्म, लोकसंख्येचा दाखला (ग्रामीण भागासाठी) इत्यादी . अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन  महाव्यवस्थापक,  जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली  यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

000000

No comments: