सामाजिक समता कार्यक्रमाच्या निमित्ताने
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात सपंन्न
हिंगोली (जिमाका), दि. 14 : राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सामाजिक
समता कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती
आज मोठया उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल
राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय काटकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जेष्ठ तैलचित्रकार
भा.मा.परसवाळे, उदय लक्ष्मी स्पर्धा परिक्षा केंद्राचे संचालक भिमराव वायवळ, परिक्षक
मयुरी पांचाळ-, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले भ.मा.परसवाळे यांनी डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची सखोल माहिती दिली.
या कार्यक्रमात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंर्गत
जमीन मिळालेले लाभार्थी यांचेशी चर्चा करुन जमिनी बाबत शासनाच्या विविध योजनांचे त्यांना
मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त
शिवानंद मिनगीरे यांनी केले.
प्रारंभी मान्यवराच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती
शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
तसेच याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रांगोळी
स्पर्धा घेण्यात आली. या रांगोळी स्पर्धेसाठी 77 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर
चलचित्र रथ (एल.ई.डी.) चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन
करण्यात आले. याप्रसंगी संविधान कॉर्नर,हिंगोली येथे अनुयायांना मान्यवरांचे हस्ते
अल्प उपहार वाटप करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवराचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी
पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अशोक इंगोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन बार्टी समतादुत सुरेश पठाडे
यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल वडकुते, शेषराव जाधव, बालाजी टेंभुर्णे, नितीन
राठोड, दत्ता कुंभार, अनंत बिजले, भास्कर वाकळे, मनीष राजुलवार, नागनाथ नकाते, विश्वनाथ
बिहाडे, विशाल इंगोले, सुकेशनी व्हडगीर, सुलोचना ढोणे, पल्लवी गिते, गयाबाई खंदारे,
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी वृंद तसेच जिल्ह्यातील
सर्व समतादूत उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment