रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान
तरुण युवकांनी रक्तदान करावे
-
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी
हिंगोली, दि. 10 (जिमाका) : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून प्रत्येक सक्षम तरुण युवकांनी
रक्तदान केलेच पाहिजे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी
व्यक्त केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये राष्ट्रनिर्माते
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती सामाजिक समता कार्यक्रमा
निमित्ताने आज दि. 10 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी,
डॉ. मोरे, डॉ. शिवाजी गिते, डॉ. चौधरी, नीरज देशमुख, बार्टीचे प्रकल्प अधिकारी
सिद्धार्थ गोवंदे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक समता कार्यक्रम हे दि. 06 एप्रिल ते 16 एप्रिल, 2022 पर्यंत
मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमातून राबविण्यात येत असून प्रत्येक सक्षम तरुण
युवकांनी रक्तदान करणे ही काळाची गरज आहे, असे मत प्रास्ताविक करतांना समाज कल्याण
सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी
व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अशोक इंगोले यांनी
केले. यावेळी रक्तदान शिबिरासाठी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपमाला पाटील, प्रयोगशाळा
तंत्रज्ञ विद्या तौर, रक्तपेढी तंत्रज्ञ प्रदीप सोळंके, समाजसेवा अधीक्षक रामचंद्र
दुधाळकर, अधिपरिचारक अमोल गिरी, अरविंद कदम, नितीन चव्हाण या रक्तपेढी टीमने
सहकार्य केले. समाजकल्याण बार्टी व जात पडताळणीचे कर्मचारी, कास्ट्राईब संघांचे
कर्मचारी, विविध इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक, अनेक विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने
रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले.
यावेळी भीमशक्तीचे
विशालभाऊ इंगोले, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे भिमराव नेतने, प्रवीण रुईकर,
गंगाधर पाईकराव, रमेश खंदारे, नामदेव सपाटे, वैभव कांबळे, जाधव, शासकीय मुलींचे
निवासी वस्तीगृहाच्या सिंधुताई राठोड, गजानन बिहाडे, दीपक कांबळे, नागनाथ नकाते,
आनंत बिजले, भास्कर वाकळे, भगवान पठाडे
आदी सामाजिक कार्यकर्ते सह विविध इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक व विद्यार्थी तरुण
युवक-युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते.
रक्तदान शिबीर कार्यक्रमासाठी बार्टीचे प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ
गोवंदे, समतादूत सुरेश पठाडे, प्रफुल पटेबहादूर, श्रीमती ढोणे, गिते, संगीता
खांदळे, सखाराम चव्हाण, संदीप घनतोडे,
रितेश बगाटे, विजय आयरेकर, पुंडगे,
रवींद्र खंदारे, जाधव, शुभम यादव, हरीश पुंडगे आदीसह सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण, बार्टी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कर्मचारी आदींनी
परिश्रम घेतले.
*****
No comments:
Post a Comment