शिष्यवृत्ती पात्र
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज नोंदविण्याचे आवाहन
31 मे पर्यंत अर्ज
नोंदणी करावी
हिंगोली, (जिमाका) दि. 30 : शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज
नोंदविण्यासाठी आगामी 31 मे पर्यंतची अंतिम
मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली
यांनी केले आहे.
सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील महाविद्यालयांत प्रवेशित
अनुसूचित जाती, इमाव, विजाभज तसेच विमाप्र प्रवर्गातील प्रवेशित व भारत सरकार मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाइन
अर्ज नोंदणी करण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून ऑनलाइन प्रणाली सुरु आहे. सर्व प्रवेशित
व शिष्यवृत्तीस पात्र अनु.जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी
ऑनलाइन अर्ज महाडिबीटी प्रणालीवर नोंदविण्यासाठी 31 मे 2022 ही अंतिम मुदत असल्याने
शिष्यवृत्तीस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज नोंदणी करावी. तसेच महाविद्यालय
स्तरावरील अर्जांपैकी पात्र असलेले अर्ज येत्या 31 मे पर्यंत मंजूर करण्याचे आवाहन
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
सन 2021-22 या वर्षामधील एकूण
929 अर्ज आज रोजी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित
दिसून येत आहेत. दरम्यान अनुसूचित जाती, विजाभज,
इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज महाडिबीटी प्रणालीवर नोंदविण्यासाठी
28 फेब्रुवारी पर्यंत मुदत दिली होती. अर्ज भरण्यास अडचणी येत होत्या, त्यामुळे अनु.जाती ला 7 मार्च तर विजाभज,
इमाव व विमाप्र यांना अर्ज भरण्यासाठी 31 मार्च त्यानंतर वाढ करुन 30 एप्रिल देण्यात
आली होती. आता पुन्हा एकदा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात येऊन ती 31 मे,
2022 पर्यंत केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सर्वात जास्त शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असलेली दहा
महाविद्यालये
हिंगोली जिल्ह्यातील स्व.दत्तराव हैबतराव थोरात नर्सिंग स्कुल, (हिंगोली)-68,
एल.डी.एच.टी.स्कूल ऑफ नर्सिंग (हिंगोली)-51, यशवंत इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंग स्कूल (हिंगोली)-33,
महात्मा फुले विद्यालय (कळमनुरी)-25 , इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल (वसमत)-24, जयहिंद
नर्सिंग स्कूल (हिंगोली)-21, श्री.धनेश्वरी मानव विकास मंडळ संचालित एस.व्ही.पी.कॉलेज ऑफ फार्मसी (हिंगोली)-21,
व्ही.बी.एन.नर्सिंग स्कूल (हिंगोली)-19, स्व.एस.डी.मस्के स्कूल ऑफ नर्सिंग (हिंगोली)-15
, अमृतराव पाटीत ज्यु.कॉलेज माळहिवरा (हिंगोली)-14 या दहा महाविद्यालयातील सर्वात
जास्त शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत.
****
No comments:
Post a Comment