हिंगोली, दि. 21 (जिमाका) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘श्री गणेशा आरोग्याचा’ ही आरोग्य जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नंदगाव येथे आरोग्य उपकेंद्र सावंगी व प्राथमिक आरोग्य केंद्र, सिद्धेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने नवयुवक गणेश मंडळासमोर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर तसेच असंसर्गजन्य आजार (NCD) संदर्भातील तपासणी करण्यात आली. तसेच क्षयरोग (टीबी), कुष्ठरोग आणि गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. किरकोळ आजारांवर उपचार करण्यात आले. संशयित मोतीबिंदू तसेच सर्दी, खोकला, ताप आदी आजारांची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार व औषधांचे वाटप करण्यात आले.
शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास शेळके, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. राम शिंदे, आरोग्य कर्मचारी हरिश्चंद्र गोलाईतकर, आरोग्य सेविका संगीता गोबाडे, गीतांजली पन्हाळे तसेच आशा कार्यकर्त्या मानकर्णा खुडे यांनी नागरिकांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
शिबिराच्या आयोजनासाठी गावातील नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी पत्रकार मनोज जैस्वाल, श्यामराव पोटफाडे, संजय पोले, उत्तम गोरे, नागोराव दळवे, बाळू जटाळे, रामा कोठुळे, विनोद गुहाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment