03 November, 2021

खाजगी प्रवासी बस धारकांकडून निश्चित केलेल्या वाहन दरापेक्षा

जास्त भाडे आकारल्यास तक्रार करावे

        हिंगोली (जिमाका), दि. 03 : सणासुदीच्या दिवसामध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. त्यामुळे खाजगी प्रवासी बस धारकांकडून मनमानी भाडेवाढ करण्यात येते. परंतु त्याला आळा घालण्यासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि.मी. भाडेदराच्या 50 टक्‌क्यापेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडे दर शासनाने दि. 27 एप्रिल, 2018 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहेत.

            हिंगोली जिल्ह्यातील सर्व जनतेनी प्रवास करताना खाजगी बस वाहन धारकांकडून निश्चित केलेल्या वाहन दरापेक्षा जास्त भाडे दर आकारत असतील तर आपण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली यांच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार करावे, असे आवाहन हिंगोली येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे. 

****

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 05 रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज 05 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 53 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 654 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 05 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाचे आयोजन

      हिंगोली (जिमाका), दि. 03 : उद्योग संचालनालय, उद्योग विभाग पुरस्कृत जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांच्या वतीने औंढा नागनाथ येथे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक (डीटीपी) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक, जातीचे प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला कार्यालयात जमा करुन नांव नोंदणी करुन घ्यावे, मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना व शासनाच्या विविध योजनेच्या अनुदानासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग करता येतो.

 तसेच यामध्ये शासकीय, निमशासकीय संस्थांच्या कर्ज व अनुदान विषयक योजनेची माहिती बाबत मार्गदर्शन, उद्योग निवड, बाजारपेठ पाहणी, यशस्वी उद्योजकांचे गुण, संभाषण कौशल्य व व्यक्तीमत्व विकास, उद्योग व्यवस्थापन व प्रकल्प अहवालाची माहिती तसेच यशस्वी  उद्योजकांचे व उद्योग अधिकारी यांचे मार्गदर्शन  मिळणार आहे. प्रवेश मर्यादित असल्यामुळे दिनांक 14 नोव्हेंबर, 2021 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करण्यात यावा.  नाव नोंदणीसाठी किसन धाबे (मो. 9370631461), कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर पवार, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

*****

विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाचे आयोजन

      हिंगोली (जिमाका), दि. 03 : उद्योग संचालनालय, उद्योग विभाग पुरस्कृत जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांच्या वतीने औंढा नागनाथ येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक (डीटीपी) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक व शाळा सोडल्याचा दाखला कार्यालयात जमा करुन नांव नोंदणी करुन घ्यावे, मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना व शासनाच्या विविध योजनेच्या अनुदानासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग करता येतो.

 तसेच यामध्ये शासकीय, निमशासकीय संस्थांच्या कर्ज व अनुदान विषयक योजनेची माहिती बाबत मार्गदर्शन, उद्योग निवड, बाजारपेठ पाहणी, यशस्वी उद्योजकांचे गुण, संभाषण कौशल्य व व्यक्तीमत्व विकास, उद्योग व्यवस्थापन व प्रकल्प अहवालाची माहिती तसेच यशस्वी  उद्योजकांचे व उद्योग अधिकारी यांचे मार्गदर्शन  मिळणार आहे. प्रवेश मर्यादित असल्यामुळे दिनांक 14 नोव्हेंबर, 2021 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करण्यात यावा.  नाव नोंदणीसाठी किसन धाबे (मो. 9370631461), कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर पवार, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

*****

01 November, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज

04 रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज 01 रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 52 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 654 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाचे आयोजन

      हिंगोली (जिमाका), दि. 01 : उद्योग संचालनालय, उद्योग विभाग पुरस्कृत जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांच्या वतीने कळमनुरी येथे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक  प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक व शाळा सोडल्याचा दाखला कार्यालयात जमा करुन नांव नोंदणी करुन घ्यावे, मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना व शासनाच्या विविध योजनेच्या अनुदानासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग करता येतो.

 तसेच यामध्ये शासकीय, निमशासकीय संस्थांच्या कर्ज व अनुदान विषयक योजनेची माहिती बाबत मार्गदर्शन, उद्योग निवड, बाजारपेठ पाहणी, यशस्वी उद्योजकांचे गुण, संभाषण कौशल्य व व्यक्तीमत्व विकास, उद्योग व्यवस्थापन व प्रकल्प अहवालाची माहिती तसेच यशस्वी  उद्योजकांचे व उद्योग अधिकारी यांचे मार्गदर्शन  मिळणार आहे. प्रवेश मर्यादित असल्यामुळे दिनांक 8 नोव्हेंबर, 2021 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करण्यात यावा. नाव नोंदणीसाठी सुभाष बोरकर (मो. 9921400577), कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर पवार, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

*****

महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन

      हिंगोली (जिमाका), दि. 01 : उद्योग संचालनालय, उद्योग विभाग पुरस्कृत जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांच्या वतीने हिंगोली येथे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक महिलांनी फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक व शाळा सोडल्याचा दाखला कार्यालयात जमा करुन नांव नोंदणी करुन घ्यावे, मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना व शासनाच्या विविध योजनेच्या अनुदानासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग करता येतो.