विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 03
: उद्योग संचालनालय, उद्योग विभाग पुरस्कृत जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली व महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांच्या वतीने औंढा नागनाथ येथे विद्यार्थ्यांसाठी
मोफत संगणक (डीटीपी) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी फोटो, आधार
कार्ड, बँक पासबुक व शाळा सोडल्याचा दाखला कार्यालयात जमा करुन नांव नोंदणी करुन घ्यावे,
मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना व शासनाच्या विविध योजनेच्या अनुदानासाठी
या प्रमाणपत्राचा उपयोग करता येतो.
तसेच यामध्ये शासकीय, निमशासकीय संस्थांच्या कर्ज
व अनुदान विषयक योजनेची माहिती बाबत मार्गदर्शन, उद्योग निवड, बाजारपेठ पाहणी, यशस्वी
उद्योजकांचे गुण, संभाषण कौशल्य व व्यक्तीमत्व विकास, उद्योग व्यवस्थापन व प्रकल्प
अहवालाची माहिती तसेच यशस्वी उद्योजकांचे व
उद्योग अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
प्रवेश मर्यादित असल्यामुळे दिनांक 14 नोव्हेंबर, 2021 पर्यंत आपला प्रवेश निश्चित
करण्यात यावा. नाव नोंदणीसाठी किसन धाबे (मो.
9370631461), कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, दुसरा मजला, प्रशासकीय
इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन शंकर पवार, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास
केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment