18 November, 2021

 

शिक्षक पात्रता परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हास्तरावर शिक्षक पात्रता परीक्षा-2021 (MAHATET) हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी दि. 21 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 10.30 ते दु. 1.00 आणि दुपारी 2.00 ते 4.30 या दोन सत्रात घेण्यात येणार आहे. त्या परीक्षा केंद्राची यादीपुढील प्रमाणे असून कंसात दर्शविलेले क्रमांक हे त्या त्या परीक्षा केंद्रांचा केंद्र संकेताक आहे.

सकाळच्या सत्रात शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-1 ची परीक्षा सकाळी 10.30 ते 1.00 यावेळेत 1) आदर्श महाविद्यालय, हिंगोली इमारत-1 (5501 A), 2) आदर्श महाविद्यालय, हिंगोली इमारत-2 (5504 B), 3) शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली (5504), 4) सरजूदेवी भि.भा.आर्य कन्या विद्यालय, हिंगोली (5505), 5) शांताबाई मुंजाजी दराडे हायस्कूल, हिंगोली (5506), 6) विद्यानिकेतन इंग्लीश स्कूल, हिंगोली (5507), 7) पोतदार इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल बळसोंड (5508), 8) कन्या प्रशाला, हिंगोली (5509), 9) अनुसया विद्यामंदिर खटकाळी परिसर, हिंगोली (5510) या 09 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.  

दुपारच्या सत्रात शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-2 ची परीक्षा दुपारी 2.00 ते 4.30 यावेळेत 1) सेंक्रेड हार्ट इंग्लीश स्कूल, हिंगोली (5502), 2) माणिक स्मारक आर्य वि., हिंगोली (5503), 3) शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली (5504), 4) सरजूदेवी भि.भा.आर्य कन्या विद्यालय, हिंगोली (5505), 5) शांताबाई मुंजाजी दराडे हायस्कूल, हिंगोली (5506), 6) विद्यानिकेतन इंग्लीश स्कूल, हिंगोली (5507), 7) पोतदार इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल बळसोंड (5508), 8) कन्या प्रशाला, हिंगोली (5509), 9) अनुसया विद्यामंदिर खटकाळी परिसर, हिंगोली (5510) या 09 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. 

या कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. वरील सर्व  परीक्षा केंद्रावर सकाळी 9.00 ते सायंकाळी  5.00 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हा दंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

*****

No comments: