पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या गोळीबार सरावासाठी
मौजे वगरवाडी येथील क्षेत्र उपलब्ध
हिंगोली, (जिमाका) दि. 25 : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस
अधिनियम 1951 मधील कलम 33 (1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा, जि. हिंगोली येथील
फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात दि. 24 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, 2021 पर्यंत परभणी
जिल्ह्याच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी,
अंमलदार यांना गोळीबाराचा सराव करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
या कालावधीत पुढील अटीवर गोळीबार सरावासाठी मैदान
उपलब्ध करुन
देण्यात येत आहे. हे ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. परिसरात गुरांना
न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा
सूचना पोलीस
अधिकारी यांनी दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे संबंधित गावी
सर्व संबंधितांना द्याव्यात. तसेच तहसीलदार औंढा नागनाथ व पोलीस स्टेशन
हट्टा यांनी
मौ. वगरवाडी फायरींग बट परिसरात दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे या
आदेशाची प्रसिध्दी करावी,
असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment