09 November, 2021

वसमत क्रिडा संकुलासाठी 5 कोटीचा निधी उपलब्ध करून देणार - ना. आदितीताई तटकरे

 



वसमत क्रिडा संकुलासाठी 5 कोटीचा निधी उपलब्ध करून देणार - ना. आदितीताई तटकरे

 

हिंगोली (जिमाका) दि.9: जिल्हयातील वसमत येथील तालुका क्रिडा संकुलासाठी 5 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही राज्याचे पर्यटन, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, उद्योग आणि खनीकर्म,  राज्यमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी  आज वसमत तालुक्यातील बाभुळगांव येथील आयोजित कार्यक्रमात दिली.

            वसमत तालुक्यातील बाभुळगांव येथील विविध विकासकामे व गुणवंत विद्यार्थी सत्कार, कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणार्‍या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार समारंभ तसेच नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर हे होते. तर व्यासपीठावर आमदार राजुभैय्या नवघरे, दिलीप चव्हाण, महादेव एकलारे, तानाजी बेंडे, गोरख पाटील जिजा हरणे, अ. हफीज अ. रहेमान, उत्तम दगडु यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी राज्यमंत्री श्रीमती तटकरे यांनी बोलतांना सांगीतले की, आमदार राजुभैय्या नवघरे यांनी गेल्या 15 वर्षांपासुन राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमामुळे सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे महत्वाचे काम होत असुन हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यासाठी आपल्या सर्वांचे पाठबळ व आर्शिवाद मिळाल्यामुळेच हे करणे शक्य झाले आहे. या प्रतिष्ठाणने सामान्य नागरीकांना शासनाच्या विविध योजना तसेच आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम कौतुकास्पद असुन या माध्यमातून समाज उपयोगी व पुण्याचे काम होत असल्याचे त्यांनी नमुद केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देवुन आपले मुळ गांव, मुळ स्थान कधीही न विसरता समाजासाठी काही तरी देणे समजुन आपण पुढाकार घेतला पाहिजे अशा शुभेच्छा दिल्या.

            तसेच कोरोना काळात अंगणवाडी सेवीका, मदतनीस, आशावर्कर यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत प्रत्येक घरी भेट देवुन कुंटुंबातील सदस्यांचे आरोग्याची तपासणी केली व त्यांचा डाटा संकलीत केला.

            वसमत येथील जुने क्रिडा संकुल अपुरे पडत असल्यामुळे क्रिडा संकुलासाठी दहा ते अकरा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली असुन या जागेपैकी पाच ते सहा एकर जागेमध्ये क्रिडा संकुल व उर्वरीत जागेत बिओटी तत्वावर व्यवसायिक गाळे बांधण्याचा माणस आहे. यामुळे क्रिडा संकुलासाठी चांगल्या प्रकारचे मैदान उपलब्ध होणार असुन तसेच गाळे बांधकामामुळे नागरीकांना व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध होणार आहेत. यासाठी क्रिडा विभागाकडुन पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच बाराशिव हनुमान तिर्थक्षेत्राचा दर्जा वाढवुन प्रादेशीक पर्यटनाच्या माध्यमातुन जादा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

            तसेच तालुक्यातील वेगवेगळया दर्ग्यांनासुध्दा जास्तीत जास्त सुशोभीकरण व अधिकच्या मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. माझ्याकडे असलेल्या सर्व विभागाच्या माध्यमातुन निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. असे सांगितले.

            यावेळी बोलतांना आमदार नवघरे म्हणाले की, दिवाळी हा सण फक्त कुटुंबात साजरा न करता सर्व जातीधर्मातील नागरीकांसोबत साजरी करण्याची गेल्या 15 वर्षांपासुन बाभुळगांव येथे राबविण्यात येत असुन वसमत विधानसभा मतदार संघात विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबीर व शासकीय योजनाचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांना देण्यासाठी विविध शिबीरे घेण्याचा उपक्रम राबवित आहोत. या माध्यमातुन जनतेची सेवा करण्याचे काम करण्यात येत आह,असे सांगुन क्रिडा संकुलासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.

            माजी मंत्री दांडेगांवकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मागील अनेक दिवसामध्ये आरोग्य तपासणी शिबीरे घेवुन 30 ते 40 चाळीस हजार लोकांवर उपचार करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम या मतदार संघात होत आहे. या माध्यमातुन महाराष्ट्रात एक वेगळा व चांगला मतदार संघ तयार करण्याचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी बाभुळगांव सर्कल मधील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

No comments: