इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेशासाठी
धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 22 : - महाराष्ट्र शासनातर्फे
राज्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2020-21 पासून शहरातील इंग्रजी
माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर
समाजाच्या विद्यार्थ्यांकडून शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी
शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या शाळेमध्ये प्रवेशित
विद्यार्थ्यांना शिक्षण, निवारा, आरोग्य, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश इत्यादी
सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा
विद्यार्थी धनगर (केवळ धनगर जातीतील विद्यार्थ्यांसाठी) समाजाचा असावा.
विद्यार्थ्यांच्या पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या
धनगर समाजाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत सादर करावी.
विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा रुपये एक लाख इतकी असावी. सन 2021-22
या वर्षात विद्यार्थी इयत्ता पहिली किंवा दुसरीमध्ये प्रवेशास पात्र असावा.
हिंगोली जिल्ह्यातील धनगर
समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी
शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा जि. हिंगोली
या संस्थेच्या कै. एल.एस. नाईक इंग्लीश स्कूल, कोळसा, जि. हिंगोली या शाळेची निवड
करण्यात आली आहे. या शाळेमध्ये शासनाकडून 100 विद्यार्थी संख्या मंजूर केली आहे.
या शाळेमध्ये प्रवेश
घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण , डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, पहिला मजला, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या
पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली या कार्यालयात दि. 22 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर,
2021 पर्यंत सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन
वेळेत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी श्रीमती अभिलाषा बेंगाळ (मो.9834855210)
यांच्याशी संपर्क साधावा व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन शिवानंद
मिनगीरे,सहायक आयुक्त,समाज कल्याण,हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment