जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाने
26 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर या कालावधीत
हुंडाबंदी सप्ताह साजरा करावा
हिंगोली (जिमाका), दि. 26 : - शासनाने 26 नोव्हेंबर
हा दिवस हुंडाबंदी दिन व या दिवसापासून पुढील सात दिवस हुंडाबंदी सप्ताह साजरा
करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात 26
नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिवस म्हणून तसेच या दिवसापासून पुढील सात दिवस
हुंडाबंदी सप्ताह साजरा करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील
प्रत्येक शासकीय कार्यालयाने दि. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, 2021 या कालावधीत
हुंडाबंदी सप्ताह साजरा करावा. तसेच या हुंडाबंदी सप्ताहानिमित्त प्रत्येक
कार्यालयात हुंडाबंदी दिनाची शपथ घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
****
No comments:
Post a Comment