सावरखेडा, बासंबा, खानापूर चित्ता येथील शेतकऱ्यांनी
राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 साठी संपादित जमिनीचा
ताबा सात दिवसाच्या आत द्यावा
अन्यथा राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार सक्तीने
ताबा घेण्यात येईल
- उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची शेतकऱ्यांना नोटीस
हिंगोली
(जिमाका), दि. 24 : - राष्ट्रीय
महामार्ग क्र. 161 करिता संपादित झालेल्या मौजे सावरखेडा, बासंबा व खानापूर चित्ता
ता. जि.हिंगोली येथील जमिनीचे सावरखेडा येथील शेतकरी 1) अशोक यशवंतराव हरण व पंडित
यशवंतराव हरण यांचे गट क्र. 235,244,246 मधील क्षेत्र, 2) पंढरी नारायण हरण यांचे गट
क्र. 185 मधील संपादित क्षेत्र, 3) विठ्ठल गणपती हरण, विश्वनाथ गणपती हरण, दत्तराव
गणपती हरण व विमलबाई संपतराव हरण यांचे सामाईक क्षेत्र असलेले गट क्र. 187 मधील संपादित
क्षेत्र, 4) माधव दाजीबा हरण यांचे गट क्र. 139 मधील संपादित क्षेत्र, 5) प्रकाश लक्ष्मण
हरण यांचे गट क्र. 133 मधील संपादित क्षेत्र, 6) रामदास लक्ष्मण हरण यांचे गट क्र.
133 मधील संपादित क्षेत्र, 7) राजाराम गंगाराम हरण यांचे गट क्र. 15 मधील संपादित क्षेत्र,
बासंबा येथील शेतकरी 8) रामकिसन नारायण मुंढे यांचे गट क्र. 565 मधील संपादित क्षेत्र,
खानापूर चित्ता येथील शेतकरी 9) देविदास लक्ष्मण
पवार यांचे गट क्र. 06 मधील क्षेत्र व 10) नामदेव पुंडलिकराव पवार यांच्या गट क्र.
130 मधील संपादित करण्यात आलेल्या क्षेत्रावर रस्त्याचे काम करण्यास अडथळा निर्माण
करीत आहेत.
वरील संपादित जमीनधारक/शेतकरी यांच्या संपादित क्षेत्राचा निवाडा
दि. 27 ऑगस्ट, 20218, 31 ऑगस्ट, 2018, 27 मे, 2019, 30 जून, 2020 व 21 ऑक्टोबर,
2020 रोजी घोषित करण्यात येवून मावेजा प्राप्त करुन घेण्यासंबंधीची नोटीस देण्यात आली
होती. त्यानुसार वरील सर्व शेतकऱ्यांना मावेजा वाटप करण्यात आला आहे. तसेच भूसंपादन
मोबदला रक्कम वाटप करताना संपादित होणाऱ्या क्षेत्राच्या मालकीबद्दल अथवा मोबदला रक्कमेतील
हिश्यानुसार वाद निर्माण झाल्यास मा. प्रमुख जिल्हा न्यायालय यांच्या न्यायालयात
(The Principal civil court of original jurisdication within the limits of whose
jurisdication the land is situated) राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 चे कलम 3
(H) (4) नुसार त्यांच्या निर्णयासाठी मोबदला रक्कम जमा करता येईल, असे नमूद आहे. त्यानुसार
वरील शेतकऱ्यांच्या वादग्रस्त क्षेत्राचा मावेजा मा. विद्यमान जिल्हा न्यायाधीश-1,
परभणी यांच्या न्यायालयात जमा करण्यात आलेले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 च्या मावेजाबाबत कागदपत्रे सादर
करण्यासाठी वरील सर्वांना नोटीसीद्वारे लेखी सूचित केले आहे. या नोटीसीमध्ये निवाडा
घोषित झाल्यानंतर नोटीस बजावल्यापासून 60 दिवसाचे आत संपादित जमिनीचा कब्जा/ताबा सक्षम
अधिकारी यांच्याकडे द्यावा अन्यथा राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 चे कलम 3(E) मधील
तरतुदीनुसार जमिनीचा सक्तीने ताबा घेण्यात येईल, असे नमूद केले आहे.
त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 मध्ये संपादित झालेल्या
क्षेत्राचा ताबा 07 (सात) दिवसाचे आत उपविभागीय अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, राष्ट्रीय
महामार्ग क्र. 161, हिंगोली यांच्या ताब्यात देण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय महामार्ग
कायदा 1956 चे कलम 3 (E) नुसार पोलीस बंदोबस्त लावून सक्तीने ताबा घेण्यात येईल याची
नोंद घ्यावी, अशी नोटीस संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली आहे, असे उपविभागीय अधिकारी
तथा सक्षम प्राधिकारी भूसंपादन एनएच-161, हिंगोली यांनी प्रसध्दीपत्रकाद्वारे कळविले
आहे.
*******
No comments:
Post a Comment