26 November, 2021

 





जिल्हा ग्रंथालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन

 

           हिंगोली (जिमाका), दि. 26 : - आजादी का अमृत महोत्सवानिमित्त येथील जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आज भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

यावेळी भारतीय संविधान दिनानिमित्त महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

          या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, नूतन साहित्य मंदिर वाचनालयाचे कोषाध्यक्ष प्रा. जी. पी. मुपकलवार, ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह संतोष ससे, मिलींद थंबल, कुंडलीकराव सरकटे, गजानन सावके, कुलदीप मास्ट, पंडित अवचार, मिलींद सोनकांबळे, रामभाऊ पुनसे  व ग्रंथालय पदाधिकारी, विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे. यावेळी  मान्यवरांचा ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.

****

No comments: