माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा हिंगोली जिल्हा दौरा
कार्यक्रम
हिंगोली (जिमाका) दि. 8 : राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा
व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे
या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबर,2021
रोजी सकाळी ८.३० वाजता परभणी येथून औंढा जि. हिंगोली कडे प्रयाण. 9.15 वाजता औंढा नागनाथ
येथे आगमन व दर्शन, सकाळी 9.45 वाजता औंढा नागनाथ येथून वसमत कडे प्रयाण. सकाळी
10.15 वाजता वसमत येथे आगमन व जयप्रकाश दांडेगावकर
यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट.
सकाळी 10.45 वाजता वसमत येथून
बाभूळगाव ता. वसमतकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता बाभूळगाव येथे आगमन व विविध विकास
कामे व सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती- मतदार संघातील गुणवंत विद्यार्थी सत्कार
समारंभ, कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर सत्कार समारंभ,
शेती क्षेत्रात व हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांचा
सत्कार, नेत्र तपासणी व नेत्र चिकित्सा शिबीराचे उद्घाटन, दिवाळी निमित्त फराळ वाटप
कार्यक्रम, दुपारी 1.45 वाजता बाभूळगाव ता. वसमत येथून शासकीय वाहनाने औरंगाबाद कडे
प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment