खाजगी प्रवासी बस धारकांकडून निश्चित केलेल्या वाहन दरापेक्षा
जास्त भाडे आकारल्यास तक्रार करावे
हिंगोली
(जिमाका), दि. 03 : सणासुदीच्या दिवसामध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणावर
प्रवास करतात. त्यामुळे खाजगी प्रवासी बस धारकांकडून मनमानी भाडेवाढ करण्यात येते.
परंतु त्याला आळा घालण्यासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि.मी. भाडेदराच्या
50 टक्क्यापेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडे दर शासनाने दि. 27 एप्रिल,
2018 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व जनतेनी
प्रवास करताना खाजगी बस वाहन धारकांकडून निश्चित केलेल्या वाहन दरापेक्षा जास्त
भाडे दर आकारत असतील तर आपण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली यांच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार
करावे, असे आवाहन हिंगोली येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी
केले आहे.
****
No comments:
Post a Comment