खेलो इंडिया अंतर्गत जिल्हास्तरीय खो-खो, कबड्डी
व बास्केटबॅाल स्पर्धेचे आयोजन
22 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे
आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : खेलो इंडिया अंतर्गत चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन
दिनांक 05 फेब्रुवारी 2022 रोजी हरीयाणा या ठिकाणी निश्चित झालेले आहे. या स्पर्धां
18 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात होणार आहेत. चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी
महाराष्ट्र राज्याचे खो-खो 18 वर्षं मुले, मुली, कबड्डी 18 वर्ष मुले, मुली व बास्केटबॅाल
फक्त 18 वर्ष मुली या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन त्यातून निवड चाचणी
घेऊन संघ निवडण्यात येणार आहेत.
18 वर्षे वयोगटातील मुले,
मुली यांच्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल, हिंगोली येथे दि. 23 व 24 नोव्हेंबर, 2021 रोजी
कबड्डी व खो-खो या खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी खेळाडूंनी
दि. 23 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. तर 18 वर्षे
वयोगटातील मुलींसाठी दि. 23 व 24 नोव्हेंबर, 2021 रोजी पोद्दार इंग्लीश स्कूल, हिंगोली
येथे बॉस्केटबॉल या खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी खेळाडूंनी
दि. 23 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
वरील स्पर्धांसाठी सहभागी खेळाडू दिनांक 01 जानेवारी, 2003 रोजी किंवा त्यानंतर
जन्मलेला असावा. खेळाडूने स्पर्धेस, निवड चाचणीस येतांना सोबत आधारकार्ड, माध्यमिक
शाळा प्रमाणपत्र (10 वी बोर्ड प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र ( ग्राम पंचायत / नगर परिषद) यापैकी किमान दोन कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरीय
स्पर्धेसाठी, निवड चाचणीसाठी शाळा, कल्ब यांच्या संघांना प्रवेश दिला जाईल. शाळाबाह्य
संघातून सहभागी होऊ न शकणाऱ्या खेळाडूंना जिल्हास्तर निवडचाचणीसाठी प्रवेश दिला जाईल.
जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी संघ व हारलेल्या संघातील उत्कृष्ट खेळाडू व निवड चाचणीसाठी
आलेल्या खेळाडूंमधुन 5 खेळाडूंची पुढील स्तरासाठी निवड केली जाईल. या स्पर्धा, निवड
चाचणीचे आयोजन खेलो इंडिया युथ गेम्ससाठी राज्यसंघ निवड करण्याकरिता करण्यात येत असल्याने
सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जाणार नाही. याची खेळाडू, पालक व क्रीडा शिक्षकांनी
नोंद घ्यावी. बास्केटबॅाल या खेळाच्या 18 वर्षाखालील मुली राज्यस्तरीय अंजिक्य स्पर्धेत
थेट जिल्हास्तरावरुन संघ सहभागी होणार असल्याने विभागीय स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन
करण्यात येणार नाही.
वरील स्पर्धेसाठी आपल्या प्रवेशिका दिनांक 22 नोव्हेंबर, 2021 रोजी सांय. 5.00
वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावी व वयाबाबतचा पुरावा
मुळ प्रतीत स्पर्धास्थळी, निवड चाचणीस्थळी सोबत ठेवावा.
उपरोक्त सर्धा, निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त खेळाडू (18 वर्षाखालील
मुले , मुली) सहभाग नोंदवावा व अधिक माहितीसाठी श्री. मारोती सोनकांबळे, क्रीडा अधिकारी
9881071770 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमओद्दीन फारुखी
यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment