जिल्ह्यात कोविड-19 चा
नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज
04 रुग्णांवर उपचार
सुरु
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही, तर आज 01 रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज
देण्यात आला आहे. तसेच 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी
माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत
कोविड-19 चे एकूण 16 हजार 52 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 654 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज
घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले
आहे.
*******
No comments:
Post a Comment