15 November, 2021

 

भारतीय डाक विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी कामगिरी प्रमाणित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

      हिंगोली (जिमाका), दि. 15 : केंद्र शासनाच्या भारतीय डाक विभागाद्वारे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंच्या विविध पदांसाठी भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. या खेळाडू भरतीसाठी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडू पात्र ठरणार आहेत.

भारतीय डाक विभागाचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक 27 नोव्हेंबर, 2021 हा आहे. पात्र खेळाडूंनी विहित वेळेत त्यांच्या मान्यता प्राप्त खेळाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती अभिलेखे व भारतीय शालेय खेळ महासंघाच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे प्राप्‍त होणाऱ्या खेळाडूंच्या अर्जाची तपासणी करुन विहित वेळेत फॉर्म  क्र. 4 उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

यासाठी शालेय स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी त्यांची कामगिरी प्रमाणित करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत दि. 22 नोव्हेंबर, 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुखी यांनी केले आहे.

*****

No comments: