आझादी का अमृत महोत्सवानिमित्त हिंगोली शहरातील विविध ठिकाणी
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना संदर्भातील माहितीचे
पत्रक व पुस्तिका वितरण करुन जनजागृती
हिंगोली, दि.29 (जिमाका)
: जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती
कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आज हिंगोली
शहरातील गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व शहरातील विविध ठिकाणी जाऊन आंतरराष्ट्रीय
दत्तक महिना संदर्भातील माहिती पत्रक आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती पुस्तिका
वितरीत करण्यात आली. तसेच बाल कायद्यांची माहिती देवून जनजागृती करण्यात आली.
नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक
महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने कक्षाकडून बालकासंदर्भात आणि
बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक
घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी www.cara.nic.in
या संकेत स्थळावर कायदेशीर प्रक्रिया व नोंदणी करुन इच्छुक पालक बालकाला दत्तक घेऊ
शकतो. याविषयी व बालविवाह प्रतिबंध कायदा-2006, बाल संगोपन योजनेविषयीची माहिती कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी
दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, बाह्य क्षेत्र
कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment