खाजगी वाहनांनी एसटी ने विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारु
नये
हिंगोली (जिमाका) दि.
11: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी
वाहतुक बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय
हिंगोली मार्फत खाजगी वाहने उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. त्यासाठी तालुक्यात अधिकाऱ्यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच आगारामध्ये प्रवाशांसाठी उपाययोजना करण्यात
येणार आहेत असे जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील एसटी बस आगारासाठी
परिवहन विभागातील संपर्क अधिकारी, पोलीस विभागातील संपर्क अधिकारी व एसटी महामंडळातील
अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली आगारासाठी परिवहन विभागातून मोटार
वाहन निरीक्षक शैलेशकुमार कोपुल्ला, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रमोद गोटे, पोलीस
निरीक्षक श्री. कदम, श्री. चोथमल, वसमत व औंढा बसस्थानकासाठी मोटार वाहन निरीक्षक नलिनी काळपांडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक निलेश पवार, पोलीस निरीक्षक
शिवाजी गुरमे, अ.बा. निकाळजे, एसटी विभागातून
तर कळमनुरी व सेनगाव बसस्थानकासाठी मोटार वाहन निरीक्षक जगदीश माने, सहायक मोटार वाहन
निरीक्षक पवन बानबाकोड, पोलीस निरीक्षक श्री. निकाळजे व एसटी. महामंडळातील अ.व. बोरीकर वाहतुक व्यवस्थेवर नियंत्रक अधिकारी म्हणून मोटार वाहन निरीक्षक आशिक तडवी यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
संप कालावधीमध्ये शासनाच्या दिनांक
8 नोव्हेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेतील कलम
66 चे उप कलम 3 चा खंड एन अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन शासनाने सर्व खाजगी बस,
स्कूलबस, कंपनी मालकीच्या बस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुकीला मान्यता दिली
आहे. ही सूट दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजीच्या
मध्यरात्री पासून प्रस्तावित संप ज्यावेळी मागे घेतला जाईल त्यावेळी ही अधिसूचना रद्द
समजण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत.
याकाळात खाजगी वाहनांनी अधिकभाडे
आकारणी केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार त्यांच्या विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात
येईल. त्यामुळे सर्व संबंधितांनी एस टी ने विहित केलल्या मर्यादेपेक्षा जास्त भाडे
आकारु नये, असे अवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment