माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी घेतले
औंढा येथील श्री नागनाथ देवाचे दर्शन
हिंगोली (जिमाका) दि.९- बारा ज्योतिर्लिंगापैकी हिंगोली जिल्ह्यातील औंढा
नागनाथ येथे असलेल्या आठवे ज्योतिर्लिंग श्री.नागेश्वर देवाचे राज्याच्या उद्योग, खनिकर्म,
पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार व माहिती व जनसंपर्क विभागाच्या
राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दर्शन घेऊन नागनाथ देवाचा दुग्धाभिषेक केला.
यावेळी
आमदार राजू नवघरे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी नागनाथ देवस्थानच्या वतीने राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा देवस्थानचे अध्यक्ष
वैजनाथ पवार यांनी नागनाथाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.
000000
No comments:
Post a Comment