25 November, 2021

 



आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व आझादी का अमृत महोत्सव निमित्त

महिला व बालविकास विभागाच्या वतीने वसमत येथे जनजागृती

 

हिंगोली, दि.25 (जिमाका) :  जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिनाआझादी का अमृत महोत्सव निमित्ताने दि. 22 व 23 नोव्हेंबर, 2021 रोजी वसमत येथे तहसीलदार अरविंद बोळंगे यांची  प्रत्यक्ष भेट घेऊन आंतरराष्ट्रीय दत्तक महिना संदर्भातील माहिती पत्रक व जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती पुस्तिका देण्यात आली. तसेच तहसील कार्यालयात माहिती पत्रक लावून जनजागृती करण्यात आली.

उपजिल्हा रुग्णालय वसमतचे वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्री.चिवळे यांची भेट घेऊन माहिती पुस्तिका देण्यात आली व विविध विषयावर माहिती देण्यात आली. तसेच जि.प.शाळा वसमत येथे बालकांचे हक्क आणि अधिकारी या विषयी माहिती देण्यात आली.

            नोव्हेंबर हा महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी www.cara.nic.in या संकेत स्थळावर कायदेशीर प्रक्रिया व नोंदणी करुन इच्छुक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो, अशी माहिती  बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी दिली. बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजने विषयीची माहिती राहुल सिरसाट (डा.ए.ऑ.) यांनी दिली. तर बालकांच्या कायद्याविषयीची माहिती क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी दिली. तसेच अधिक माहितीसाठी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

*****

No comments: