असंघटीत कामगारांना ई-श्रम कार्डाचे वाटप
हिंगोली (जिमाका) दि.9: असंघटीत
क्षेत्रातील कामगारांच्या राष्ट्रीय डाटा बेस तयार करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर
च्या माध्यमातून ई- श्रम कार्ड तयार करणे सुरु आहे त्यानुसार आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते चार असंघटीत कामगारांना
ई- श्रम कार्डाचे वाटप करण्यात आले. यावेळी सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड, सुविधाकार एन. एस. भिसे, कॉमन सर्व्हिस सेंटरचे
जिल्हा समन्वयक गजानन काळे आदींची उपस्थिती होती.
कॉमन सर्व्हिस सेंटर एकूण 780
असून त्यांच्या माध्यमातून आज रोजी पर्यंत 59 हजार 880 कामगारांची नोंद केलेली असून
जिल्ह्यामध्ये जे असंघटित कामगार आहेत. त्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिला, रस्त्यावरील
विक्रेते, दुग्धव्यवसायिक, ऑटो चालक, मॅकानिक, शिलाई मशीन कामगार, नाव्ही, आशा वर्कर,
अंगणवाडी सेविका, सुतार, पेंटर, बांधकाम कामगार,
इलेक्ट्रीशियन, हॉटेल चालक, ब्युटी पार्लर, वीट भट्टी कामगार, बचत गट महिला, वृत्तपत्र
विक्रेते, मच्छिमार, शेत मजूर, मिल कामगार इत्यादींनी कामगारांची आपल्या जवळच्या कॉमन
सर्व्हिस सेंटर वर जाऊन नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment