आझादी का
अमृत महोत्सव व बाल हक्क सप्ताहानिमित्त
खानापूर
चित्ता येथील श्री स्वामी समर्थ बालगृहात मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 18 : आझादी का अमृत महोत्सव आणि बाल हक्क सप्ताहानिमित्ताने
हिंगोली तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील श्री स्वामी समर्थ बालगृहात दि. 17
नोव्हेंबर रोजी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी बालगृहातील बालकांना बाल हक्क
संहितेविषयी मार्गदर्शन करुन संवाद साधला. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे
यांनी बालकांना शिक्षणाचा अधिकार याविषयी माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण कक्षातील
बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान
पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड . अनुराधा पंडित , समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक
कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, क्षेत्र बाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी बालगृहातील
बालकांसोबत विविध कायद्याविषयी संवाद साधला.
यावेळी बालगृहातील
बालकांना जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने व्हॉलीबॉल भेट देण्यात आला. तसेच बालकांचे
क्रिकेट व व्हॉलीबॉल खेळ घेण्यात आले. यावेळी बालगृहाचे अधीक्षक रमेश पवार, काळजी वाहक
राम पर्वत उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment