वृत्त क्र.573 दिनांक : 12 डिसेंबर 2017
हिंगोली
जिल्ह्यातील कर्जमाफी झालेल्या
लाभधारकांनी
मानले शासनाचे आभार
हिंगोली, दि. 12 :- राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय घेऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार
हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना
1 लाख 50 हजारापर्यंत तर नियमीत
कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यास शासन प्रयत्नशील आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण
9 हजार 410 शेतकऱ्यांच्या खात्यात 40 कोटी
85 लाख रुपये जमा केले आहेत. जिल्ह्यात डिसेंबर 2017 पासून प्रत्यक्ष
लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पुर्णत्वाच्या टप्प्यात
आहे.
मागील तीन ते चार
वर्षांपासून दुष्काळ आणि नापिकीमुळे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत
नव्हती , त्यातच घेतलेल्या कर्जाच्या
व्याजाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच होता ,
शेती पिकण्याची शक्यता नव्हती, अशातच
शासनाने कर्जमाफी केल्याबद्दल
शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे , अशा प्रतिक्रिया प्रत्यक्ष त्यांच्या
शेतात जाऊन मुलाखती घेतल्यानंतर कर्जमाफी झालेल्या लाभार्थींनी व्यक्त केल्या आहेत.
जिल्ह्यातील श्रीपती नामदेव लोणकर मु.इंचा ता. जि.
हिंगोली या शेतकऱ्यांना रु. 26 हजार 917 रुपये
, श्रीमती कांताबाई चंद्रप्रभा टापरे मु. साटंबा यांना रुपये 70 हजार , श्री. जयराम
गोविंदा तपासे यांच्या पत्नीला 26 हजार
518 रुपये तर श्रीमती कुंजाबाई पांडूरंग चाटसे रा. इंचा ता. जि. हिंगोली यांना
77 हजार रुपये तर श्रीमती केवडाबाई सुभाष तपासे रा. साटंबा , ता.जि. हिंगोली यांनाही
कर्जमाफी झाल्याची माहिती संबंधित लाभधारक शेतकऱ्यांनी यावेळी दिली असून सर्व लाभधारकांनी शासनाचे आभारही मानले आहेत.
00000
No comments:
Post a Comment