वृत्त क्र.587
वेतन
पडताळणी पथकाचा दौरा
हिंगोली,दि.27 :-
वेतन पडताळणी पथकाचा
माहे जानेवारी
2018 चा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील
प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा
व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे.
हे
पथक मंगळवार 4
जानेवारी 2018 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व 5 व 6 जानेवारी
2018 रोजी जिल्हा व तालुका स्तरावरील इतर
कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी
हे वेतन पडताळणी पथक या कालावधीत येथील कोषागार कार्यालयात उपस्थित राहील. ज्या
कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही
त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद
यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment