वृत्त क्र.582
लघु उद्योगांनी उत्कृष्ट
कामगिरीकरिता देण्यात
येणाऱ्या पुरस्कारासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21:- उद्योग संचालनालय ,
महाराष्ट्र शासन यांच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट
कामगिरी करणाऱ्या लद्यु उद्योग घटकांना प्रथम व द्वितीय
पारितोषिक देऊन गौरविण्यात येते . प्रथम पुरस्कारासाठी
रु. 15 हजार व गौरवचिन्ह तर द्वितीय पारितोषिक रु.10 हजार व गौरवचिन्ह दिले जाते . सन 2017 करिता जिल्हा पुरस्कारासाठी हिंगोली जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी
खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे .
उद्योग
घटकांची जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडे
स्थायी लघु उद्योग म्हणून तीन वर्षांपूर्वी म्हणजेच
दिनांक 1 जानेवारी 2014 पूर्वी नोंदणी झालेली असावी व उद्योग घटक मागील दोन वर्षांपासून उत्पादनात असणे आवश्यक
आहे , उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, यापूर्वी ज्या उद्योग घटकांना राज्यस्तरीय
किंवा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळालेले
नाहीत असेच उद्योग घटक जिल्हा पुरस्कारांसाठी
पात्र ठरतील. विहित नमुन्यातील अर्ज व अधिक
माहितीकरिता जिल्हा उद्योग केंद्र , हिंगोली या कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा , अर्ज स्विकारण्याची
शेवटची तारीख 31 डिसेंबर 2017 आहे , या सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांनी या पुरस्कारासाठी अर्ज
करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment