वृत्त क्र.583
स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्ती वेतन योजनेकरिता अर्ज करण्याची अखेरची
संधी
हिंगोली, दि.21:-स्वातंत्र्य सैनिकांसाठी
निवृत्तीवेतन योजना सुरु होऊन बराच कालावधी
लोटला असल्यामुळे या योजनेखाली
अर्ज करण्याची एक अखेरची संधी उपलब्ध
करुन देण्याचे शासनाने ठरविले आहे.
त्यादृष्टीने आता ज्या अर्जदारांकडे शासन निर्णय दिनांक 4 जुलै 1995 व दिनांक 18 एप्रिल
2015 अन्वये विहित निकषांनुसार आवश्यक पुरावे
उपलब्ध असतील त्यांनी शासन निर्णयांच्या दिनांकापासून
1 महिन्याच्या कालावधीत म्हणजेच दिनांक
7 जानेवारी 2018 पर्यंत संबंधित जिल्हाधिकारी
यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक राहील . तसेच संबंधित
जिल्हाधिकारी यांनी दिनांक 7 जानेवारी 2018 पर्यंतच अर्ज स्विकारावेत त्यानंतर येणारा कोणताही अर्ज स्विकारु नये असे शासन
निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे. तरी हिंगोली जिल्ह्यातील पात्र अर्जदारांनी 7 जानेवारी 2018 पर्यंत संबंधित
जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत , असे
आवाहन जिल्हाधिकारी , हिंगोली यांच्यावतीने
करण्यात आले आहे .
0000
No comments:
Post a Comment