वृत्त क्र.576 दिनांक : 16 डिसेंबर 2017
अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांबाबत
जाणीव करुन देण्यासाठी
अल्पसंख्यांक दिनी जिल्हाधिकारी
कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, 16:- संयुक्त
राष्ट्रांनी दिनांक 18 डिसेंबर 1992 रोजी
राष्ट्रीय,वांशिक, धार्मिक आणि भाषिक
अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा जाहिरनामा स्विकृत करुन प्रस्तुत केला आहे . त्यानुसार
दरवर्षी 18 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा केला
जातो.
त्यास अनुसरुन
अल्पसंख्यांक विकास विभाग ,
महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस
अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या
दिवसानिमित्त अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्कांबाबत जाणीव
करुन देण्यासाठी दि. 18 डिसेंबर रोजी
दुपारी 12.00 वाजता जिल्हा नियोजन समिती
सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय , हिंगोली येथे अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांना
उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment