वृत्त क्र.585
जिल्ह्यात राष्टीयकृत व खाजगी
बँकामार्फत आधार नोंदणी केंद्र सुरु
हिंगोली, दि.26:- जिल्ह्यातील सिंडीकेट बँक , एच.पी. गॅस एजन्सीजवळ, नारायण नगर येथे 1 ऑक्टोबर 2017 पासून आधार केंद्र सुरु करण्यात
आले आहे, आधार नोंदणीची वेळ सकाळी 10.00 ते 4.00 पर्यंत संपर्क क्रमांक 02456-220049 आणि आय.सी.आय.सी.आय.
बँक, चेदीया कॉम्प्लेक्स , नवा मोंढा येथे दिनांक 2 डिसेंबर पासून आधार नोंदणी केंद्र
सुरु करण्यात आले असून वेळ सकाळी 10.00 ते दुपारी 4.30 पर्यंत संपर्कासाठी क्रमांक
7410071313 आहे .
तसेच नंतर महाराष्ट्र बँकेचे(हिंगोली
येथे)- 1 आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक, वसमत,
औंढा ना. कळमनुरी , अकोला रोड हिंगोली येथे
4 असे एकूण 5 आधार नोंदणी केंद्र लवकरच जानेवारी / फेब्रुवारी 2018 पर्यंत
सुरु होत आहेत.
तरी जिल्ह्यातील नागरीकांनी आपले आधार
कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी वरील आधार नोंदणी केंद्रावर संपर्क साधावा , असे आवाहन अग्रणी बँक
व्यवस्थापक , हिंगोली यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment