वृत्त क्र.577
जिल्ह्यात नवीन तलाठी सजांची
व महसूली मंडळांची
निर्मिती
हिंगोली, दि.16: जिल्ह्यात महसूल प्रशासनातील
क्षेत्रीय यंत्रणेतील महसूल सजांची पुनर्रचना, नवीन सजा निर्मिती करण्यात येणार
असून, जिल्ह्यात 61 नवीन तलाठी सज्जे निर्माण होणार आहेत. महसूल सजांची पुनर्रचना,
नवीन सजा निर्मिती व तलाठीची होणारी वाढ यामुळे महसूल विभागात कामकाज वेगाने
होण्यास मदत होणार आहे.
तसेच दुसऱ्या टप्यामध्ये महसूल मंडळांची स्थापना करण्याबाबतची
अधिसूचना दिनांक 15 डिसेंबर 2017 रोजी
सबंधित महसूल मंडळ अधिकारी मुख्यालय , तलाठी सज्जा मुख्यालय तसेच हिंगोली, कळमनुरी , सेनगाव , वसमत, औंढा नागनाथ
येथील तहसील कार्यालये व हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा ना. येथील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात नोटीस बोर्डवर
प्रसिध्दीसाठी देण्यात आली आहे .
महसूली मंडळ स्थापन
करण्याबाबतची प्रारुप अधिसूचनेवर
तहसिलदार यांनी दिनांक 15 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2017 या कालावधीत जनतेकडून हरकती व सूचना स्विकाराव्यात
त्यानंतर आलेल्या हरकती व सूचना
विचारात घेऊ नयेत. प्राप्त हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी यांचा अभिप्राय , आवश्यक तो पुरावा,
नकाशा यासह दिनांक 10 जानेवारी 2018 पर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी
श्री. अनिल भंडारी यांनी दिल्या आहेत.
000
No comments:
Post a Comment