28 December, 2017

महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन



वृत्त क्र.588                                                                           दिनांक : 28 डिसेंबर 2017

महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.28:- सन 2016-17 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारत  सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण  शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेसाठी  अर्ज  भरले होते त्यापैकी कार्यालय स्तरावरील सर्व अर्ज निकाली काढून संबंधित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे . तरी पण आजस्थितीत जुन्या शिष्यवृत्ती पोर्टलवर  काही विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांच्या  स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे सदर अर्ज  निकाली  काढणे शक्य  नाही. महाविद्यालयनिहाय  प्रलंबित अर्जाबाबत  समाज कल्याण  विभागामार्फत  महाविद्यालयांच्या ई मेल आयडी वर पत्र पाठवून  यापूर्वी  कळविण्यात  आले आहे .  तरी संबंधित  महाविद्यालयाने आपल्यास्तरावर असलेले प्रलंबित  अर्ज समाज कल्याण विभागास  आवश्यक असलेल्या  कागदपत्रांसह  सादर करुन व ऑनलाईनद्वारे  समाज कल्याण विभागाकडे दि. 5 जानेवारी 2018 पर्यंत  सादर करावेत जेणेकरुन समाज कल्याण विभागास  सदर अर्जाची  तपासणी करुन पात्र अर्ज निकाली काढणे  सोयीचे  होईल. जुने  शिष्यवृत्ती पोर्टल सिमीत  कालावधीसाठीच सुरु  असल्याने दि. 5 जानेवारी 2018 पर्यंत  महाविद्यालयाकडून समाज कल्याण विभागास  आवश्यक  कागदपत्रांसह  प्रलंबित  अर्जांच्या मूळ प्रती व बी स्टेटमेंट सादर न केल्यास  तसेच ऑनलाईन प्रक्रियेद्वारे  सुध्दा समाज  कल्याण  विभागास  अर्ज सादर  न केल्यास  महाविद्यालयस्तरावर राहीलेले प्रलंबित  अर्ज निकाली  काढता येणार नाही . येईल  त्यामुळे  जिल्ह्यातील  पात्र  मागासवर्गीय  विद्यार्थी  लाभापासून वंचित  राहिल्यास  त्याची सर्व जबाबदारी  संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्यांची राहील याबाबत  जिल्ह्यातील  सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी गांभिर्याने नोंद घ्यावी , असे  आवाहन सहायक आयुक्त , समाज कल्याण , हिंगोली यांनी केले आहे .
0000

No comments: