वृत्त क्र. 568 दिनांक : 07 डिसेंबर 2017
क्षयरुग्ण शोधण्यासाठी घर
चलो मोहिमेस प्रारंभ
हिंगोली,दि.07: सुधारीत
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यकमांतर्गत
दिनांक 5 डिसेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी
अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम 2017 बाबत आढावा
बैठक पार पडली. या बैठकीमध्ये क्षयरोगाबाबत
प्रथमत: आढावा घेण्यात आला व नंतर क्षयरुग्ण शोध मोहीम दिनांक 4 ते 18 डिसेंबर या कालावधीत
जिल्ह्यात प्रभावी व दर्जेदारपणे व
प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी भंडारी
यांनी उपस्थित वैद्यकीय अधीक्षक , तालुका
आरोग्य अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना विशेष सूचना दिल्या व जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून काढण्याकरिता आरोग्य कर्मचारी यांनी पूर्ण क्षमतेने काम करण्याचे सूचविले .
झोपडपट्टी , ऊसतोड मजूर,
विटभट्टी मजूर, रस्ते व बांधकाम मजूर, निराधार,
निराश्रीत, अनाथाश्रमे, वृध्दाश्रमे, स्थलांतरीत, नॅको ने निवडलेली जोखीमग्रस्त गावे
आदी अतिजोखमीच्या भागामध्ये सर्व्हे होणार आहे. क्षयरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात 1 लाख 13 हजार 345 जोखीमग्रस्त
लोकसंख्येचा सर्व्हे आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन केला जाणार आहे. क्षयरोग शोधमोहिमे दरम्यान आढळून आलेल्या संशयित
क्षयरुग्णांची तपासणी आवश्यकता असल्यास सीबीनॅट
मशीनद्वारे केली जाणार आहे .
संशयित रुग्णांचा थुंकी
नमुना तपासणी व क्ष किरण तपासणी मोफत केली जाणार आहे. तरी ज्यांना दोन आठवड्यांपासून खोकला, ताप, वजन कमी
होणे , थुंकीवाटे रक्त पडणे इत्यादी लक्षणे
आढळून येणाऱ्या व्यक्तींनी या मोहीमेमध्ये मोफत थुंकी तपासणी जवळच्या
सरकारी दवाखान्यात करुन घ्यावी . क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णावर मोफत
औषधोपचार केला जाणार आहे . या मोहिमेचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
अनिल भंडारी यांनी केले आहे .
00000
No comments:
Post a Comment