वृत्त क्र. 563 दिनांक : 02 डिसेंबर 2017
मतदार नोंदणीच्या विशेष
मोहीमेस
दिनांक 15 डिसेंबर 2017
पर्यंत मुदतवाढ
हिंगोली,दि.02: भारत निवडणूक
आयोगाचे निर्देशानुसार मतदार नोंदणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
यांनी घरो घरी भेटी देवुन राबविण्यात येणाऱ्या
विशेष मोहीमेची मुदत दिनांक 15 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे . मतदार नोंदणीपासून वंचित असलेल्या
नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी
नमुना नं.6 मधील अर्ज , तसेच आपल्या कुटुंबातील मयत , दुबार, स्थलांतरीत झालेल्या
मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना नं.8 मधील अर्ज व त्याच
विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतील
नाव स्थलांतरीत करण्यासाठी नमुना 8 अ मधील
अर्ज आपल्या मतदान केंद्राच्या मतदान मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा संबंधित तहसिल कार्यालयातील , निवडणूक शाखेकडे सादर करावा तसेच अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी किंवा
02456-221113 या दूरध्वनीवर संपर्क साधावा,असे
आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी , हिंगोली यांचे वतीने करण्यात येत आहे .
00000
No comments:
Post a Comment