सन 2017-18 चे जिल्हा
क्रीडा पुरस्कार व जिल्हा युवा पुरस्कार जाहिर
1 मे महाराष्ट्र दिनी पुरस्कारांचे
वितरण
हिंगोली, दि.27:
क्रीडा विभागाच्या वतीने दरवर्षी
गुणवंत खेळाडू , गुणवंत क्रीडा
मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा
कार्यकर्ता/ संघटक पुरस्कार
जिल्हाधिकारी , हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीने खालील पुरस्कार जाहिर
केले आहेत .
गुणवंत खेळाडू (महिला)-
कु. चव्हाण शितल सुरेश या खेळाडूने
कुस्ती खेळात महाराष्ट्र
राज्य कुस्तीगीर परिषद तसेच
राज्यस्तरावरील प्राविण्य प्राप्त
केले असून पुरस्काराचे स्वरुप रु.
10 हजार , स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे
राहील .
गुणवंत क्रीडा
मार्गदर्शक – श्री . रामप्रकाश माधवराव
व्यवहारे – पुरस्कारासाठी पात्र
ठरले असून यांनी मैदानी खेळात राज्य ,
राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. त्यांन
देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप रु. 10 हजार , स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे
राहील.
गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/ संघटक -श्री.
शिवाजी श्रावण इंगोले हे पुरस्कारासाठी
पात्र ठरले असून त्यांना देण्यात येणारे पुरस्काराचे स्वरुप रोख रुपये 10 हजार ,
स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे राहील.
जिल्हा युवा पुरस्कार:-जिल्हा य़ुवा संस्था पुरस्कारासाठी
सद्भाव सेवाभावी संस्था, परभणी ही संस्था पात्र ठरली असून संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार
भारतीया यांना पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. या संस्थेने हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण
भागात युवा विकास कामे, सामाजिक कामे, सांस्कृती संबंधीत कार्य, सामाजिक कार्य, दुर्बल
घटक जातीचे कार्य करणे, शिक्षण क्षेत्रात कार्य, आरोग्य संबंधीचे कार्य, पर्यावरण संबंधीचे
कार्य, क्रीडा संबंधीचे कार्य, युवकांच्या सर्वांगिण विकासाचे कार्य इ. कामे केलेले
आहेत. पुरस्काराचे स्वरुप रु. 50 हजार, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे आहे.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या
अध्यक्षतेखाली क्रीडा पुरस्कार निवड समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, चंदा
रावळकर, जिल्हा युवा समन्वयक, नेहरु युवा केंद्र
प्रा. बंकट नंदलाल यादव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेश नामदेवराव गंगावणे,
जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते, श्री. संतोष फुफाटे, क्रीडा अधिकारी यांच्या समितीने
सदर पुरस्कार जाहिर केले आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख
पारितोषिक ( क्रीडा पुरस्काराकरीता 10 हजार , जिल्हा युवा पुरस्कार संस्थेकरीता 50हजार) असे असून
सदर पुरस्काराचे वितरण मा. पालकमंत्री महोदय, हिंगोली यांच्या हस्ते दि. 01 मे
2018 रोजी प्रदान करण्यात येणार आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी कळविले आहे .
000000
No comments:
Post a Comment