जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष
कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती
हिंगोली,दि.11: जिल्ह्यात
दिनांक 14 ते 30 एप्रिल 2018 पावेतो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात
येणार आहे. सदर उत्सवानिमित्त जिल्ह्यात
मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे दृष्टीने
बंदोबस्त लावण्यात येतो सदर जयंतीउत्सव काळात शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण
होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते. अशाप्रकारे अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस
तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यांसोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता असते. त्यामुळे दिनांक 14 एप्रिल ते 30 एप्रिल 2018 पर्यंत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात मिरवणुकीच्या दरम्यान उद्भवणारी
कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्याकरिता संपूर्ण
हिंगोली जिल्ह्यात सर्व 13 पोलीस स्टेशनकरीता
प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश निर्गमित होणेस विनंती केली आहे.
त्यानुसार
जिल्हाधिकारी हिंगोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये शक्तीचा वापर करुन हिंगोली जिल्ह्यात दिनांक 14 ते 30 एप्रिल
2018 या कालावधीत जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब
आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त मिरवणुकीच्या दरम्यान उद्भवणारी कायदा व सुव्यवस्थेचा
प्रश्न हाताळण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी यांची खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात येत आहे . पोलीस स्टेशन वसमत शहर
व ग्रामीण – ज्ञानोबा बानापुरे , उपविभागीय
अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी, वसमत, पोलीस स्टेशन हट्टा- श्रीमती ज्योती
पवार तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी , वसमत, पोलीस स्टेशन कुरुंदा- श्री.
सचिन जैस्वाल नायब तहसिलदार महसूल-1 वसमत, पोलीस स्टेशन हिंगोली शहर व ग्रामीण – श्री.
प्रशांत खेडेकर उपविभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी , हिंगोली, पोलीस स्टेशन नर्सी महादेव-
श्री. गजानन शिंदे तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी हिंगोली , पोलीस स्टेशन
बासंबा श्री. माधव बोथीकर –नायब तहसलिदार महसूल
-1 हिंगोली , पोलीस स्टेशन कळमनुरी श्रीमती गोरे , तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कळमनुरी , पोलीस स्टेशन बाळापूर – श्री.
ऋषी , नायब तहसिलदार महसूल 1 कळमनुरी , पोलीस
स्टेशन औंढा नागनाथ – श्री. पांडुरंग माचेवाड
, तहसिलदार तथा तालुका कार्यकारी
दंडाधिकारी औंढा नागनाथ , पोलीस स्टेशन
सेनगांव श्रीमती वैशाली पाटील , तहसिलदार तथा तालुका
कार्यकारी दंडाधिकारी सेनगांव , आणि
पोलीस स्टेशन गोरेगांव – श्री. पाठक , नायब
तहसिलदार महसूल-1 सेनगांव यांची कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन नियुक्ती केली आहे.
उपरोक्त
प्रमाणे नियुक्त केलेल्या
दंडाधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दी पावेतो दिनांक 14 ते 30 एप्रिल 2018 पर्यंत
कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करीत आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी
यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशन शिवाय त्यांच्या
उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे व तहसिलदार तथा तालुका कार्यकारी
दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशन शिवाय त्यांच्या तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणून
नियंत्रण ठेवावे असे जिल्हाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment