‘महामानवाला
अभिवादन’ लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन
हिंगोली,
दि.09: भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने
‘महामानवाला अभिवादन’ हा लोकराज्यचा एप्रिल महिन्याचा विशेषांक तयार करण्यात आला असून
या विशेषांकाचे प्रकाशन खासदार राजीव सातव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई
नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश
मिणियार आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम, देशमुख यांच्या
हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी.सभागृहात करण्यात आले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रसिध्द
करण्यात आलेल्या ‘महामानवाला अभिवादन’ हा अंक अत्यंत वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखा
आहे. या विशेषांकामध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकण्याचे
प्रयत्न करण्यात आला आहे. लोकराज्यचा हा विशेषांक वृत्तपत्र विक्रेते आणि जिल्हा माहिती
कार्यालय, हिंगोली या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग
बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (नरेगा) खुदाबक्श तडवी आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी
यांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment