03 April, 2018

राज्यसेवा पूर्व परीक्षा-2018 जिल्ह्यातील 04 उपकेंद्रावर


राज्यसेवा पूर्व परीक्षा-2018 जिल्ह्यातील 04 उपकेंद्रावर

हिंगोली, 03: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 रविवार दिनांक 8 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 व दुपारी 3.00 ते 5.00 या वेळात हिंगोली जिल्हा मुख्यालयी 04 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी 04 उपकेंद्रावर (एकूण 1152 परीक्षार्थी) परीक्षा देणार आहेत.
सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर  डिजिटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भूत असलेली  कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दूरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तू, बॅग्ज अथवा  आयोगाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यास आयोगामार्फत सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रावरील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी  परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रावर फक्त पेन, पेन्सिल , प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा  मूळ पुरावा  व त्याची छायाप्रत अथवा  प्रवेश केंद्रावर प्रवेश देण्यात येईल . परीक्षा केंद्रावर बंदोबस्त  लावण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्राच्या प्रवेश दारावर पोलीसांमार्फत  तपासणी  करण्यात येणार आहे .
सदर परीक्षेच्या दरम्यान परीक्षा कक्षात उमेदवारांकडे मोबाईल फोन/दूरसंचार साधनांसह आयोगाने बंदी  घातलेले इतर कोणतेही साहित्य आढळून आल्यास तसेच  कॉपीचा /गैरप्रकाराचा प्रयत्न  करत असल्याचे  निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराविरुध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. याची सर्व  संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी आवाहन केले आहे.

0000

No comments: