जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल 2018
हिंगोली,दि.21: हिवतापाचा
प्रसार ॲनॉफिलीस डासाच्या
मादीपासून होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते . उदा. भातशेती , स्वच्छ पाण्याची
डबकी , नाले , नदी , पाण्याच्या टाक्या ,
कालवे इत्यादीमध्ये होते . हिवताप
प्रसारक ॲनॉफिलीस डासाची
मादी हिवताप रुग्णास चावल्यावर
रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू
डासाच्या पोटात जातात . तेथे वाढ होऊन
डासांच्या लाळेवाटे निरोगी
मनुष्याच्या शरीरात सोडले जातात.
निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू
यकृतामध्ये जातात व तेथे
त्याची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला
थंडी वाजून ताप येतो. हिवतापाची
लक्षणे – थंडी वाजून ताप येणे , ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस
आड येऊ शकतो , नंतर घाम येऊन अंग
गार पडते , डोके दुखते , बऱ्याच वेळा
उलट्या होतात, हिवतापाचे निदान –
हिवतापाच्या निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाचा रक्त नमुना घेऊन तो सुक्ष्म दर्शकाखाली तपासणे
आवश्यक असते . हिवताप उपचार
सुधारीत उपचार पध्दती रक्त नमुना संशयित
हिवताप रुग्णाचा रक्तनमुना
घेऊन हिवताप रुग्ण दुषित
आल्यावर त्यांना वयोगटानुसार क्लोरोक्वीन गोळ्यांची पूर्ण मात्रा
द्यावी व सुक्ष्मदर्शकाद्वारे रक्तनमुने
तपासणी अंती हिवतापाचे निश्चित निदान
झाल्यावर संबंधित रुग्णास जंतूच्या प्रकारानुसार योग्य तो
औषधोपचार देण्यात यावा , किटकजन्य
रोगांना प्रतिबंध – हिवताप , डेंगू ,
चिकुनगुनिया हे सर्व रोग स्वच्छ पाण्यात डास अंडी घालून त्यापासून डास अळी
व नंतर डास तयार होतात याला प्रतिबंध
करण्यासाठी घरातील सर्व पाणीसाठे
आठवड्यातून एक दिवस धुवून पुसुन
कोरडे करणे आवश्यक आहे . घाण पाण्यात
क्यलेक्स डासाची मादी अंडी घालते व त्यापासून
हत्तीरोगाची लागण होते म्हणून
आपल्या परिसरातील सर्व नाल्या
वाहत्या होतील. डबकी , खड्डे यांच्यात पाणी साचून राहणार नाही यांची काळजी घेतली तर हिवताप ,
डेंगू , चिकुनगुणिया , हत्तीरोग होण्यात
प्रतिबंध होऊ शकतो असे आवाहन जिल्हा हिवताप
अधिकारी डॉ. जि.के. चव्हाण यांनी केले आहे .
00000
No comments:
Post a Comment