जिल्ह्यात कलम 144 लागू
हिंगोली, दि.05: हिंगोली
जिल्हा मुख्यालयी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 हि दिनांक 8 एप्रिल 2018 रोजी सकाळी
10.30 ते दुपारी 01.00 व दुपारी 3.00 ते
5.00 या वेळेत घेण्यात येणार आहे. या कालावधीत
हिंगोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती
हाताळण्यासाठी आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग अ, आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग ब,
सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल, हिंगोली आणि सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय,
हिंगोली या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू
करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
या
परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144
लागू करीत आहे. तसेच वरील परीक्षा केंद्रावर सकाळी 9.00 ते सायंकाळी 06.00 या कालावधीमध्ये
पुढीलप्रमाणे निर्बंध घालण्यात येत आहेत.
परीक्षा
उपकेंद्राचे इमारती व परिसर यामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत
व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या
200 मिटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलिफोन
बुथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षेसाठी
येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. शासकीय कर्तव्यावरील
अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक हिंगोली यांनी बंदोबस्तासाठी नेमणूक केलेल्या
पोलीस कर्मचाऱ्यांना परवानगी दिलेली आहे. अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी
यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, पेजर, गणकयंत्र इत्यादी
घेऊन जाण्यास बंदी असे जिल्हाधिकारी, हिंगोली
यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment