18 April, 2018

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत स्वयंरोजगारावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन


जिल्हा उद्योग केंद्रामार्फत स्वयंरोजगारावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन

हिंगोली, दि.18:  जिल्ह्यातील युवक /युवती करिता स्वयंरोजगारा वर आधारित  12 दिवसांचे प्रशिक्षणाचे आयोजन  दिनांक 23 एप्रिल ते 4 मे, 2018 या कालावधीत  करण्यात आले  आहे.  हा कार्यक्रम  महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्र, हिंगोली द्वारा  आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शेळी पालन, म्हैसपालन  इत्यादी विषयी  याप्रकारचे  प्रशिक्षण  दिले जाणार आहे.  सोबतच व्यवसाय  मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली आदीबाबत तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घ्यावयाचा असल्यास  18 ते 45 वयोमर्यादेतील 7 वी पास शिक्षण असलेल्या युवक व युवतींनी  दिनांक 21 एप्रिल, 2018 रोजी  दुपारी 4.00 वाजेपर्यंत  कार्यक्रम आयोजक  समाधान मोरे (मो.9158272909) एम.सी.ई.डी .जिल्हा कार्यालय द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर  करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र  उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
00000

No comments: