क्रिडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरीता क्रिडा नैपुण्य चाचणी
हिंगोली, दि.
18: शासनाने दि. 18 नोव्हेंबर,
1995 च्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये पुणे येथे क्रीडा विद्यापीठाने 14 ठिकाणी
क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे येथील क्रीडा संकुलात
शिवछत्रपती क्रीडापीठ व राज्यामध्ये 11 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सद्य:स्थितीत कार्यरत
आहेत. या 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये दरवर्षी 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींची भारतीय
खेळ प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ स्टेट, (क्रीडा नैपुण्य चाचणी) व सरळ
प्रवेश भरती प्रक्रियेद्वारे निवड करुन क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येतो.
सन 2018-19 साठी शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध
11 क्रीडा प्रबोधिनीत बॅटरी ऑफ टेस्टद्वारे व सरळ प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश देण्यास
मान्यता मिळाली आहे.बॅटरी ऑफ टेस्टमध्ये 1) वजन 2) उंची 3) 30 मी. भरधाव धावणे 4)
6 x 10 मी. शटल रन 5) उभी लांब उडी 6) उभी उंच उडी 7) मेडिसीन बॉल थ्रो 8) लवचिकता
9) 800 मी धावणे या 9 चाचण्यांचे एकूण 27 गुणांपैकी 17 किंवा त्यापेक्षा जास्त गुण
प्राप्त करणाऱ्या मुला-मुलींना क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येतो.
सन 2018-19 या वर्षाकरीता आयोजित करावयाच्या क्रीडा
नैपुण्य चाचण्यासाठी मुला-मुलींचे वयोगट खालील प्रमाणे आहे.
वयोगट
|
जन्म तारीख
|
14 वर्ष वयोगट
|
01/07/2004 व तदनंतरची असावी
|
13 वर्ष वयोगट
|
01/07/2005 व तदनंतरची असावी
|
12 वर्ष वयोगट
|
01/07/2006 व तदनंतरची असावी
|
11 वर्ष वयोगट
|
01/07/2007 व तदनंतरची असावी
|
10 वर्ष वयोगट
|
01/07/2008 व तदनंतरची असावी
|
9 वर्ष वयोगट
|
01/07/2009 व तदनंतरची असावी
|
8 वर्ष वयोगट
|
01/07/2010 व तदनंतरची असावी
|
सन 2018-19 या वर्षाकरीता नवीन प्रवेश देण्यासाठी
8 ते 14 वयोगटातील मुला-मुलींच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे ( बॅटरी ऑफ स्टेट) आयोजन
करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम प्रस्थापित करण्यात येत आहे.
क्रीडा नैपुण्य चाचण्या (बॅटरी ऑफ टेस्ट) आयोजनाचा
कालबद्ध कार्यक्रम सकाळी 10.00 वाजता खालील दर्शविलेल्या दिनांक व ठिकाणी आयोजित करण्यात
येईल.
अ.क्र.
|
कार्यक्रमाचे स्वरुप
|
क्रीडा नैपुण्य चाचण्या राबविण्याचा दिनांक
|
तालुका
|
आयोजनाचे ठिकाण
|
1
|
तालुकास्तरील चाचण्यांचे
आयोजन
|
21 एप्रिल 2018
|
कळमनुरी
|
तालुका क्रीडा संकुल, कळमनुरी
|
21 एप्रिल 2018
|
हिंगोली
|
जिल्हा क्रीडा संकुल, हिंगोली
|
||
21 एप्रिल 2018
|
सेनगांव
|
तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगांव
|
||
21 एप्रिल 2018
|
औंढा (ना)
|
शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जवळा बाजार
|
||
21 एप्रिल 2018
|
वसमत
|
बहिर्जी स्मारक विद्यालय, वसमत
|
||
2
|
जिल्हास्तरावरील चाचण्यांचे
आयोजन
|
24 ते
25 एप्रिल 2018
|
|
शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जवळा बाजार
|
वरील तारखानिहाय शाळास्तरावर
क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे काटेकोर व पारदर्शक पद्धतीने आयोजन करुन एकूण 9 चाचण्यांमध्ये
17 किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या खेळाडूंची अंतिम मूळ यादी व सविस्तर
अहवालाची मूळ प्रत उपरोक्त तालुकास्तर चाचणीच्या वेळी खेळाडूंसोबत घेऊन यावी व जिल्हास्तर
चाचणीच्या वेळी तालुका क्रीडा संयोजक यांनी तालुकास्तरावरील पात्र खेळाडूंची यादी व
अहवाल या कार्यालयात किंवा जिल्हास्तर चाचणीच्या वेळी म्हणजेच दि. 24 एप्रिल 2018 पर्यंत
या कार्यालयास सादर करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment