31 May, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन


जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
        हिंगोली,दि.31: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा  पुरवठा  अधिकारी  तथा  निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) पांडुरंग बोरगावकर उपजिल्हाधिकारी  (निवडणूक)  गोविंद   रणवीरकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, जिल्हा नियोजन  अधिकारी  विनोद कुलकर्णी  यांच्यासह  सर्व विभागप्रमुख    कर्मचारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

तंबाखुजन्य पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा


तंबाखुजन्य पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा
         हिंगोली,दि.31: 31 मे हा दिन ‘तंबाखुजन्य पदार्थ विरोधी दिन’ म्हणुन पाळला जातो. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी  जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तंबाखुजन्य पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली.
             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा  पुरवठा  अधिकारी  तथा  निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) पांडुरंग बोरगावकर उपजिल्हाधिकारी  (निवडणूक)  गोविंद  रणवीरकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी  यांच्यासह  सर्व विभागप्रमुख    कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****

30 May, 2018

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 शेतकरी कर्जमाफीसाठी मुदतवाढ


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017
शेतकरी कर्जमाफीसाठी मुदतवाढ

        हिंगोली,दि.30: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेअंतर्गत शासन निर्णय  दिनांक 9 मे, 2018 अन्वये सदर योजनेच्या व्याप्तीमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यानुसार या योजनेत  दिनांक 1 एप्रिल, 2001 ते 31 मार्च, 2009 या कालावधीत घेतलेल्या कर्जापैकी केंद्र व राज्य शासनाच्या सन 2008 व सन 2009 च्या कर्जमाफी योजनांचा फायदा न मिळालेल्या दिनांक 30 जून, 2016 रोजी थकीत  असलेल्या पीक/पुनर्गठीत व मध्यम मुदत कर्जांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याच बरोबर दिनांक 1 एप्रिल, 2001 ते 31 मार्च, 2016 या कालावधीत वाटप केलेल्या इमू पालन, पॉली हाऊस व शेडनेट यासाठी मध्यम मुदत कर्ज प्रकारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे .
        सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित  कालावधीत सदर कर्ज प्रकाराच्या बाबत नव्याने अर्ज करणे किंवा यापूर्वी  दिनांक 22 सप्टेंबर 2017 पर्यंत तसेच दिनांक 1 मार्च, 2018 पासून पोर्टलवर ऑनलाईन सादर केलेल्या अर्जामध्ये सदर कालावधीतील कर्ज प्रकारासंबंधी माहितीचा  समावेश करणे आवश्यक असल्याने सदर कर्ज प्रकारांशी निगडीत शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जखात्यांची  माहिती नवीन अर्जाद्वारे किंवा यापूर्वी केलेल्या अर्जात बदल करुन ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यासाठी  www.csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर दिनांक 5 जून, 2018 पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात  आलेली आहे.
        सदर योजनेच्या यापूर्वीच्या निकषात कोणताही बदल करण्यात आलेला नसून दिनांक 9 मे, 2018 च्या शासन निर्णयान्वये या योजनेची व्याप्ती वाढवून यामध्ये केवळ सन 2008 व सन 2009 च्या कर्जमाफी  योजनांचा लाभ मिळाला नसलेल्या दिनांक 1 एप्रिल, 2018 ते 31 मार्च, 2019 या कालावधीतील पीक / पुनर्गठन व मध्यम मुदती कर्जाचा व दिनांक 1 एप्रिल, 2011 ते दिनांक 31 मार्च, 2016 या कालावधीत  वाटप केलेल्या इमूपालन, पॉलीहाऊस व शेडनेट यासाठी मध्यम मुदत कर्ज प्रकारांचाही या योजनेत समावेश  करण्यात आला आहे.
        तरी शेतकऱ्यांनी आतापर्यंत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत किंवा यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे अर्जात वाढीव व्याप्तीचे अनुषंगाने माहितीचा भरणा दिनांक 5 जून, 2018 पर्यंत करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा उपनिबंधक सु.प्र. मैत्रेवार, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक श्री. सौदालू आणि परभणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.जी. जाधव यांनी केले आहे .
0000

हिवताप प्रतिरोध महानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन


हिवताप प्रतिरोध महानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि.30: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना जून 2018 या महिन्यात हिवताप व इतर किटकजन्य आजाराविषयी (डेंगू, चिकुनगुनिया, जे.ई. चंडीपुरा, हत्तीरोग इत्यादी) जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन त्याचा प्रतरोध उपाय योजनाच्या अंमलबजावणीमध्ये सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे हिवताप प्रतिरोध महिना पारेषण काळापूर्वी म्हणजे  जून महिन्यात साजरा करण्यात येतो. या जनजागरण मोहिमेमध्ये गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाय योजनाची माहिती योग्य त्या माध्यमाद्वारे पोहचविणे आवश्यक आहे,  डासोत्पती प्रतिबंध उपाय योजनामध्ये सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्व्हेक्षण, ग्रामीण आरोग्य पोषण आहार समितीची सभा, सर्वस्तरावरुन स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन, डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे  सोडण्याचा धडक कार्यक्रम, बचत गटाच्या सभा, शिक्षकासाठी सामाजिक जाणीव, सर्वस्तरावरील  अधिकाऱ्यांनी फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनजागृती  जनतेमध्ये  निर्माण  करणे.
 तरी हिंगोली जिल्ह्याअंतर्गत सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरीक, यांचा लोक सहभाग घेऊन गावपातळीवरील सदरील हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात यावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.
000000


कयाधू नदी पुनरज्जीवनाकरीता आयोजित जलदिंडीमध्ये नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन


कयाधू नदी पुनरज्जीवनाकरीता आयोजित जलदिंडीमध्ये
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

        हिंगोली,दि.30: कयाधू नदी पुनरुज्जीवनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरीकांचा सक्रीय सहभाग  मिळावा म्हणून जनजागृतीस्तव दिनांक 25 मे ते 5 जून 2018 या कालावधीत जलदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या जलदिडींत दररोज 500 ते 1500 जिल्ह्यातील नागरीक सहभाग नोंदविणार आहे.
        या जलदिंडीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी  यांनी सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
0000

24 May, 2018

जिल्ह्यासाठी 984.45 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर


 जिल्ह्यासाठी 984.45 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर
हिंगोली, दि. 24 :-सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत हिंगोली जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट 2018 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍ह्यासाठी  984.45  क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे.  हिंगोली- 261.45, औंढा ना.-129, सेनगाव-207, कळमनुरी-207, वसमत-180 , याची सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ,हिंगोली यांनी  केले आहे.
0000000