30 April, 2020

कोरोना निर्मूलनासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस 82 हजार रुपयांची मदत



हिंगोली दि.30: कोरोनामुळे महाराष्ट्रासह देशासमोर मोठे आर्थीक संकट उभे राहीले आहे. या संकटाम अनेक जण आपापल्या परीने आर्थीक हातभार लावत आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातंर्गत अण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकास महामंडळ समाजातील तरुणांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अर्थसहाय्य देत असते. महामंडळाच्या माध्यमातून अनेक तरुण व्यवसायीक बनले आहेत. सामाजीक बांधिलकी म्हणून या महामंडळाच्या अधिकारी/कर्मचा-यांनी आपल्या वेतनातून प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे एकूण 82 हजार रुपयांचा निधी अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार, व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा निधी जमा करुन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठविला असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हिंगोलीचे जिल्हा समन्वयक बालाजी शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
****

हिंगोलीत चार नवीन कोरोना बाधीत रुग्ण


    जिल्ह्यात एकुण 20 कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती स्थीर
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास
हिंगोली दि.30: येथील राज्य राखीव बलातील मालेगाव बंदोबस्ताहून आलेल्या नवीन तीन जवानास कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्य राखीव बल, जालना येथील जवानाच्या संपर्कात आल्याने एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याने त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, जिल्ह्यात आज चार नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे.
सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोविड-19 ची लागण झालेल्या हिंगोली व जालना येथील राज्य राखीव बलातील एकूण 16 जवान, तसेच जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आलेले 02 व्यक्ती, सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमधील एक बालक, आणि बार्शी येथून वसमत येथे आलेला 1 व्यक्ती असे एकूण 20 रुग्णांना हिंगोली, वसमत आणि सेनगाव येथील आयसोलेशन वार्ड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत असुन, सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 1172 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आज रोजी 773 रुग्ण भरती असून, 411 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 20 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून 737 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. 395 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.
कोरोना विरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****

29 April, 2020

सेवायोजना कार्यालयात नोंद असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन आधार लिंक करण्याचे आवाहन



हिंगोली दि.29: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली कार्यालयाकडे नांव नोंदणी केलेल्या नौकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड ऑनलाईन लिंक करण्याची आवश्यकता आहे. नोकरीसाठी सेवायोजना कार्यालयाकडे नांव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा,ऑनलाईन पध्दतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यात वेळोवळी आयोजीत करण्यात येणा-या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळवीणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य विकास प्रशिक्षण देणा-या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसुचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी आपल्या नोंदणीस आधार क्रमांक जोडणी करणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवार अनेक संधी पासून वंचित राहू शकतात. त्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी तात्काळ सर सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच http://www.mahaswayam.gov.in  या वेबसाईटवर उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकाला आधारकार्ड ऑनलाईन लिंक करावे, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी प्रसिध्दी पत्राकान्वये कळविले आहे.
****

हिंगोलीत दोन नवीन कोरोना बाधीत रुग्ण



हिंगोली जिल्ह्यात एकुण 16 कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती स्थीर 
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास
हिंगोली दि.29: जिल्ह्यात आज दोन नवीन कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये येथील राज्य राखीव बलातील मुंबई बंदोबस्ताहून आलेल्या एका जवानास कोविड-19 ची लागण झाली आहे. तर वसमत क्वारंटाईन सेंटर मध्ये बार्शी येथून आलेल्या 21 वर्षीय तरुण जो भरती होता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोविड-19 ची लागण झालेल्या हिंगोली व जालना येथील राज्य राखीव बलातील एकूण 13 जवान, तसेच जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आलेला त्याचा 4 वर्षीय पुतण्या, सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमधील 5 वर्षीय एक बालक आणि बार्शी येथून आलेला 1 व्यक्ती असे एकूण 16 रुग्णांना हिंगोली, वसमत आणि सेनगाव येथील आयसोलेशन वार्ड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत असुन, सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
कोरोना विरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू



हिंगोली,दि.29:  मुस्लीम धर्मीयांचा रमजान महिना दि. 25 एप्रिल, 2020 पासून सुरु झाला असून, दि. 07 मे, 2020 रोजी बुध्द पोर्णीमा आहे. पंरतू जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणुचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा अनुषंगाने संपुर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त चालू आहे.  या सण उत्सव कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दि. 30 एप्रिल, 2020 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दि. 14 मे, 2020 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी आदेश काढले आहेत.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात येत अहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  तसेच विशेषरित्या परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक, हिंगोली किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी यांना राहतील, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****


28 April, 2020

कोरोनाच्या लढाईत योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी करवसुलीच्या टक्केवारीची अट शिथील - ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती



मुंबई, दि. २८ - राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० – २१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना चालू वर्षी करवसुलीशी निगडीत वेतन न देता किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
मागील वर्षी राज्यात आपत्ती, पुरपरिस्थिती अशी संकटे उद्भवली होती. तसेच सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये सर्व प्रकारची करवसुली कमी झालेली आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गावागावांमध्ये आदर्श असे काम केले आहे. वेतनाच्या सध्या प्रचलीत पद्धतीनुसार त्यांचे वेतन करवसुलीच्या टक्केवारीशी जोडल्यात येते. सध्या ही पद्धती अवलंबिल्यास त्यांना अत्यल्प वेतन मिळेल, जे की अन्यायकारक ठरेल. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सध्या करवसुलीच्या टक्केवारीच्या आधारे वेतन न देता त्यांना निर्धारित किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गावामध्ये कमी करवसुली झाली असली तरी चांगले वेतन मिळणार आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च ग्रामपंचायत आणि राज्य शासनामार्फत करण्यात येतो. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या हिश्श्यामधून अधिकचा खर्च भागविण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
*****

हिंगोली जिल्ह्यात 03 मे पर्यंत पुर्णत: संचारबंदी


·   03 मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व व्यवहार राहणार बंद

हिंगोली,दि.28: राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली देखील तयार केली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी यांना (कोविड-19) नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहेत.
राज्य शासनाने दि. 17 एप्रिल, 2020 अन्वये सुधारीत अधिसुचना निर्गमीत करुन कोरोना (कोविड-19) संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सुचित केले आहे. त्यानुसार खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले होते. यामध्ये एक दिवस आड किराणा माल विक्री दुकाने, भाजीपाला विक्री करणारी दुकाने, दुध विक्री केंद्रे, परवाना असलेले चिकन/मटन शॉप, बेकरी, स्विटमार्ट संबंधीत दुकाने ठरवून दिलेल्या वेळापत्राकानुसार चालू राहतील असे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तसेच वेळापत्राकानुसार एक दिवसा आड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना खते व बि-बियाणांचा साठा करण्यासाठी तसेच शेतीसाठी उपयोगी साहित्य जसे की, ड्रीप, स्प्रिंकलर, पाईप पुरवठा, कृषि यंत्रे, औजारे, ट्रॅक्टर व त्यांचे सुटे भाग इत्यादी दुकाने व त्यांच्या दुरुस्तीचे दुकाने सुरळीत असणे आवश्यक असल्याने तसेच कृषी विषयक काम व कृषी बागायती कामासाठी लागणारी साहित्य विक्री व उत्पादन करणे, कृषि माल खरेदी विक्री केंद्र ही सर्व दुकाने व जिल्ह्यातील परवानाधारक कृषि सेवा केंद्र सुरु ठेवण्याबाबतचे देखील आदेश निर्गमीत करण्यात आले होते. जिल्ह्यातील ईलेक्ट्रीकल व स्टेशनरी साहित्याचे दुकाने एक दिवसा आड वेळापत्राकानुसार सुरु ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले होते. तसेच जिल्ह्यातील बोअरवेल मशीन चालू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली होती.
परंतू सद्यस्थितीची आपत्तकालीन परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात कोरोना विषाणुंचा प्रादूर्भावामुळे रुग्णांची संख्या ही वाढतांना दिसुन येत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील व्यवहार सुरु ठेवण्याबात देण्यात आलेली परवानगी रद्द करुन पुर्णत: प्रतिबंधीत करुन वरील सर्व आदेशातील दुकाने संस्था, व्यवहार,आस्थापना दि. 03 मे, 2020 पर्यंत पुर्णत: बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्यांने बाजारामध्ये, गल्लीमध्ये घराबाहेर फिरतांना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. तसेच संबंधीतावर कारवाई करण्यात येईल, याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

महाराष्ट्र दिन : मुख्य शासकीय समारंभाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन



·      जिल्हाधिकारी कार्यालय वगळता जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये
हिंगोली दि.28: करोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दि. 15 एप्रिल, 2020 च्या परिपत्रकान्वये दिले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि. 01 मे, 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 08.00 वाजता शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री श्रीमती  वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. शासन परिपत्राकान्वये यावेळी पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित राहतील. यावेळी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात इतर अधिकारी/कर्मचारी यांनी उपस्थित राहू नये.
 तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांची कार्यालये व तहसील कार्यालये येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये. जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली वगळता हिंगोली जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येवू नये असे जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
*****


हिंगोलीत पाच वर्षीय बालकास कोरोनाची लागण



हिंगोली जिल्ह्यात एकुण 14 कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती स्थीर
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास

हिंगोली दि.28: सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका 05 वर्षीय बालकाला कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील आज रोजी राज्य राखीव बलातील एकूण 12 जवानांना कोविड-19 ची लागण झाली आहे. यातील 02 जवान हे मुंबई येथे तर 10 जवान मालेगाव येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते.  तर 01 व्यक्ती जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आल्याने त्यास कोविड-19 ची लागण झाली आहे. अशाप्रकारे हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही 14 झाली आहे.
सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोविड-19 ची लागण झालेल्या हिंगोली व जालना येथील राज्य राखीव बलातील एकूण 12 जवान तसेच जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आलेला 01 व्यक्ती असे एकूण 13 तर सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटर मधील 01 रुग्ण असे एकूण 14 या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 982 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आज रोजी 694 रुग्ण भरती असून, 342 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 14 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून 626 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. 288 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.
कोरोना विरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

27 April, 2020

हिंगोलीत नवीन पाच कोरोना बाधीत रुग्ण




·   हिंगोली जिल्ह्यात एकुण 13 कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती स्थीर
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास

हिंगोली दि.27: येथील राज्य राखीव बलातील नवीन 05 जवानांचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले. येथील राज्य राखीव बलातील एकूण 12 जवानांना कोविड-19 ची लागण झाली आहे. यातील 02 जवान हे मुंबई येथे तर 10 जवान मालेगाव येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते.  तर 01 व्यक्ती जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आल्याने त्यास कोविड-19 ची लागण झाली आहे. अशाप्रकारे हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही 13 झाली आहे.
जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील कोरोना (कोविड-19) ची लागण झालेला जवान हिंगोली येथील राहत असलेल्या गावातील परिसरात व त्याच्या निकटतम संपर्कातील आलेल्या 95 व्यक्तींना आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. या सर्वांचा थ्रोट स्वॅब अहवाल तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला होता. त्यापैकी 28 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे.  यापैकी 27 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून 01 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  तर उर्वरीत अहवाल प्रलंबित आहेत.
सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोविड-19 ची लागण झालेल्या हिंगोली व जालना येथील राज्य राखीव बलातील एकूण 12 जवान तसेच जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आलेला 01 व्यक्ती असे एकूण 13 रुग्णांना येथील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत. तसेच हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 932 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आज रोजी 602 रुग्ण भरती असून, 303 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 13 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून 616 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. 330 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.
कोरोना विरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

खरीप हंगामाकरीता उच्च प्रतीच्या बियाणांचा पुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन करावे -पालकमंत्री वर्षाताई गायकवाड



हिंगोली, दि.27: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम-2020 करीता कृषी विभागाने उच्च प्रतीच्या उगवण क्षमता असलेल्या बियाणांचा पुरवठा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
      हिंगोली जिल्ह्याची खरीप-2020 हंगामपूर्व व्हिडिओ कॉन्फरंन्सीगच्या माध्यमातून आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री वर्षाताई गायकवाड बोलत होत्या. यावेळी खासदार राजीव सातव, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद पोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, सहकार विभागाचे उपनिबंधक सुधीर मैत्रेवार, कृषि विकास अधिकारी एन. आर. कानवडे यांची यावेळी व्हिडिओ कॉन्फरंन्सीगच्या माध्यमातून उपस्थिती होती.
पालकमंत्री श्रीमती गायकवाड पुढे म्हणाल्या की, खरीप हंगाम-2020 करीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी प्राप्त होवू नये, याची कृषी विभागाने दक्षाता घ्यावी. तसेच बियाणांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांची तक्रार येवू नये याकरीता आतापासूनच उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील एकुण लागवडी लायक क्षेत्रापैकी 3,78,992 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. खरीप पिकामध्ये प्रामुख्याने सोयाबीन 2,55,400 हेक्टर, तुर 52,500 हेक्टर, कापुस 45,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर प्रमुख पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय जिल्ह्यात तृण धान्य 7,954 हेक्टर, कडधान्य 70,333 हेक्टर व गळीत धान्य 2,55,655 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणे अपेक्षित आहे. तसेच या खरीप हंगामात सोयाबीन 5,093 हेक्टर, कडधान्य पिकामध्ये तुर,2,006 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरणीची वाढ होणे अपेक्षीत आहे. तर कापुस पिकाच्या क्षेत्रामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 2,011 हेक्टर एवढ्या क्षेत्राची घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये हळद पिक हे शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पिक म्हणनु समोर येत असुन, गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 2,151 हेक्टर एवढ्या वाढीव क्षेत्रासह एकुण 38,450 हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होणे अपेक्षित असल्याची माहिती पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी  यावेळी दिली.
 जिल्ह्यात सोयाबीनच्या प्रस्तावीत क्षेत्राकरीता एकुण 1,66,000 क्विंटल बियाणांची अवश्यकता असुन, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खाजगी कंपन्या तसेच शेतकऱ्यांचे स्वत:कडील बियाणे इत्यादी माध्यमातुन हे बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन बियाणांची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. कापसाच्या प्रस्तावीत क्षेत्राकरीता विविध कंपन्याचे 2,25,000 बीटी कापुस बियाण्याची पाकीटे उपलब्ध आहेत. एकंदरीत खरीप हंगामाकरीता जिल्ह्यात सोयाबीन, तुर, कापुस इत्यादी मुख्य पिका व्यतिरीक्त ज्वारी, मुग, उडीद, मका इत्यादी पिकांची बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असुन त्यात कोणत्याही प्रकारची जिल्ह्याला कमतरता भासणार नाही. तसेच जिल्ह्याला या खरीप हंगामासाठी एकुण 65,230 मेट्रीक टन एवढे रासायनिक खताचे आवंटन मंजुर झाले असून, मंजुर आवंटनाप्रमाणे खताचा पुरवठा होण्यास सुरवात देखील झाली आहे. तसेच शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रतीच्या कृषि निविष्ठा उपलब्ध व्हावी व त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी जि.प., हिंगेाली यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रत्येक तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 1 याप्रमाणे एकुण 6 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या कृषि निविष्ठेबाबत तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, हिंगेाली यांच्या अध्यक्षतेखाली 1 व प्रत्येक तालुक्यातील उपविभागीय कृषि अधिकारी, हिंगेाली यांच्या अध्यक्षतेखाली एकुण 6 तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप-2020 मध्ये रु. 1,168.95 कोटी व रब्बी हंगामाकरीता रु. 274.78 कोटी असे एकुण रक्कम रु. 1,443.73 कोटी एवढ्या पिक कर्ज वितरणांचे नियोजन करण्यात आल्याचे ही पालकमंत्री गायकवाड यावेळी म्हणाल्या.
 जिल्ह्यातील विज जोडणीकरीता प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन संबंधीतांनी वीज जोडणी द्यावी. तसेच खरीप हंगामात बोगस बियाणे, रासायनिक खते किटकनाशके विक्री व वितरण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे व रासायनिक खते योग्य प्रमाणात व योग्य वेळेत उपलब्ध होतील याकरीता कृषि विभागाने योग्य नियोजन करावे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागु असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील शेतीशी निगडीत सर्व कामे, तसेच शेतीशी निगडीत उद्योग धंदे, कृषि निविष्ठा केंद्रे, कृषि यंत्रे व अवजारे इत्यादी दुकाने, कृषि माल, बियाणे व रासायनिक खते वाहतुक इत्यादीनी कोरोना विषाणुच्या संसर्गाबाबत योग्य ती खबरदारी घेवून सुरळीतपणे सुरु राहतील याकरीता योग्य उपाययोजना कराव्यात. तसेच बियाणांची उगवण क्षमता, रासयनिक खत आणि बियाणांची उपलब्धता व पुरवठा, शेततळे, सिंचन विहीर, प्रधानमंत्री पिक विमा योजना, कृषी पंपांना वीज जोडणी, मृद आरोग्य पत्रिका, कृषी विस्तार कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, रेशीम लागवड, पिक विमा, फलोत्पादन कार्यक्रम, आपत्कालीन पीक नियोजन आदी बाबींचा सविस्तर आढावा घेवून पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या.
यावेळी खासदार राजीव सातव म्हणाले की, या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांना खत व बीयाणे खरेदीसाठी सर्व कृषि कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत. तसेच जिल्ह्याकरीता रासायनिक खताचे आवंटन मंजुर झाल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
तसेच खासदार हेमंत पाटील यांनी निकृष्ट बीयाणे व खतांचा पुरवठा होवू नये याकरीता जिल्ह्यात भरारी पथकांची नियुक्ती करावी. तसेच बीयाणे व खतांच्या गुणनियंत्रणाबाबत तक्रार नोंदविण्यासाठी जिल्ह्यात तक्रार निवारण केंद्रे स्थापन करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी बीयाणे, रासायनीक खते, किटकनाशके याची उपलब्धता तसेच पेरणीपूर्व काळजी व किडनियंत्रण, पतपुरवठा आदी माहितीचे आढावा बैठकीत सादरीकरण केले.

****

पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नमाज, तरावीह व इफ्तार घरातच करावे -पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे आवाहन



हिंगोली दि.27: सद्या पवित्र रमजान महिना सुरु असुन, या महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठ्या संख्येने मस्जीदमध्ये जावून तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामूळे मुस्लीम सामाजातील लोक नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. परंतू कोरोना प्रादूर्भावाच्या सद्य परिस्थितीचा विचार करता अधिक संख्येने लोक एका ठिकाणी एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. त्याकरीता मुस्लीम बांधवांनी मस्जीद, किंवा इतर सार्वजनीक ठिकाणी एकत्र न येता आपल्या घरातच नमाज, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करुन आपली आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा करणे मुस्लीम समाज बांधवाच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे नाही. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवांनी सार्वजनिकरित्या / मस्जीदमध्ये एकत्र येवून नमाज अदा न करणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लीम बांधवांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सामाजिक विलगीकरणाचे पालन पवित्र रमजान महिन्यात देखील कटाक्षाने करावे. मशिदीमध्ये नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येवू नये. तसेच घराच्या/इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमीत नमाज पठण अथवा इफ्तार करु नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमीत नमाज पठण, इफ्तार करु नये. कोणत्याही सामाजिक, धार्मीक किंवा कौटूंबीक कार्यक्रम एकत्रित येवून करु नये. सर्व मुस्लीम बांधवांनी त्याच्या घरातच नियमीत नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मीक कार्य पार पाडावे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी नियमाचे पालन करुन सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास फार मोठी मदत होणार असल्याचे ही पालकमंत्री वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
****



हिंगोलीत चार नवीन कोरोना बाधीत रुग्ण



·   हिंगोली जिल्ह्यात एकुण 11 कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती स्थीर 
    -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास

हिंगोली दि.27: येथील राज्य राखीव बलातील मालेगाव येथे बंदोबस्तासाठी जावून आलेल्या 04 जवानांना आज जिल्हा सामान्य रुग्णालयात हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले. या 04 रुग्णांचा पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. यापैकी 03 जवानांना दि. 23 एप्रिल, 2020 रोजी ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले होते. तर एका जवानास दि. 24 एप्रिल रोजी आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले होते. या 04 जवानांचा थ्रोट स्वॅब अहवाल दि. 25 एप्रिल रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. या 04 जवानांचा अहवाल आज प्राप्त झाला असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोविड-19 ची लागण झालेल्या राज्य राखीव बलातील 11 जवानांना दाखल केले आहे. त्यापैकी 10 जवान हे राज्य राखीव बल, हिंगोली येथे कार्यरत असून 01 जवान हा राज्य राखीव बल, जालना येथे कार्यरत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
 कोरोना विरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

25 April, 2020

जिल्ह्यातील भारत 4 मानांकन वाहनांची नोंदणी प्रक्रीया 30 एप्रिलपर्यंत पुर्ण करावी -उपप्रादेशिक परिवहन अधिकारी



हिंगोली दि.25: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भारत 4 मानांकन असणाऱ्या नोंदणी न झालेल्या वाहनांची नोंदणी प्रक्रिया दिलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करुन दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत पूर्ण करावी अशा सुचना केल्या आहेत. Federation of Automobile Dealers Association (यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्राची प्रत (आदेशात नमुद करण्यात आल्याप्रमाणे विक्री केलेल्या नोंदणी न झालेल्या वाहनांच्या यादीसह) राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पुरविण्याबाबत सूचना FADA यांना परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहन वितरकांनी दि. 31 मार्च, 2020 पूर्वी विकलेल्या परंतु नोंदणी क्रमांक अद्याप जारी न झालेल्या आपल्या वितरण संस्थेतील वाहनांबाबत Federation of Automobile dealers Association(FADA) यांच्याशी संपर्क करुन योग्य ती कार्यवाही करावी.
परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे वाहन वितरण संस्थेद्वारे FADA ला सादर केलेल्या वाहनांची यादी परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत या कार्यालयास प्राप्त  होणाऱ्या वाहनांचीच नोंदणी प्रक्रीया पूर्ण करणेबाबत आपल्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्यात यावी व अशीच नोंदणी प्रक्रीया दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत पूर्ण होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवित्र रमजान महिन्याकरीता मुस्लीम बांधवांना आवाहन



·   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे
-         जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली दि.25: जागतीक आरोग्य संघटनेने कोरोना (कोवीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य म्हणून घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने प्रसारीत होत आहे. नुकतेच हिंगोली शहरातही कोरोना संसर्ग बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च,2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करुन त्याबाबतची नियमावली तयार केली आहे. तसेच शासनाने दि. 17 एप्रिल,2020 रोजीच्या आदेशान्वये एकत्रीत सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या असुन याकरीता आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषीत केले आहे.
सद्या कोरोना संसर्गाची पार्श्वभूमीची परिस्थिती लक्षात घेता, आजपासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. रमजान महिन्यामध्ये मूस्लीम समाजात मोठ्या संख्येने मस्जीदमध्ये जावून तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामूळे मूस्लीम सामाजातील लोक नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सद्य परिस्थितीचा विचार करता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. याकरीता कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा करणे मूस्लीम समाज बांधवाच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे नाही. त्यामुळे मूस्लीम समाज बांधवांनी सार्वजनिकरित्या / मस्जीदमध्ये एकत्र येवून नमाज अदा न करणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. त्याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व मुस्लीम धर्मीय नागरिकांना खालील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. या सूचनाचे पालन करुन आपण आपले व आपल्या कुटूंबाच्या आरोग्याचे रक्षण करावे.
यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सुरु असलेला लॉकडाऊनचे ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यात देखील कटाक्षाने करावयाचे आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येवू नये. घराच्या/इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमीत नमाज पठण अथवा इफ्तार करु नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमीत नमाज पठण, इफ्तार करु नये. कोणत्याही सामाजिक, धार्मीक किंवा कौटूंबीक कार्यक्रम एकत्रित येवून करण्यास मज्जाव करण्यात आला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व मूस्लीम बांधवांनी त्याच्या घरातच नियमीत नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मीक कार्य पार पाडावे. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे पालन करावे. कोरोना (कोवीड-19) विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी यासाठी सहकार्य केल्यास या रोगाचा प्रसार रोखण्यास फार मोठी मदत होणार आहे. आपण सर्व या आवाहनास प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये व्यक्त केली आहे.
****

हिंगोलीत अजून एक कोरोना बाधीत रुग्ण



·   हिंगोली जिल्ह्यात एकुण 7 कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती स्थीर
                        -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास

हिंगोली दि.25: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज एक 27 वर्षीय कोरोना बाधीत रुग्णास दाखल करण्यात आले आहे. सदर रुग्ण हा जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान आहे. मालेगाव येथील बंदोबस्ताहून परतल्यानंतर तो हिंगोली येथील आपल्या गावी आला होता. या जवानाला कोरोना (कोविड-19) ची लागण झाल्याचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथून आज प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या 46 जणांना आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. या जवानांची प्रकृती स्थीर असुन त्यास कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
कोरोना विरुध्द लढ्यात नागरीकांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व सुजाण नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

24 April, 2020

हिंगोलीकरांनो घाबरु नका, प्रशासनाला सहकार्य करा -पालकमंत्री वर्षाताई गायकवाड



हिंगोली दि.24: शहरातील राज्य राखीव पोलीस दलातील सहा जवानांना कोरोना (कोविड-19) ची लागण झाली आहे. जवानांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे.  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.  करोना विरुध्दच्या लढ्यात निश्चीतच आपल्याला यश मिळेल यात शंका नाही, परंतु या संकटाच्या काळात नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.  
मुंबई व मालेगाव या भागात जोखीमेच्या क्षेत्रात बंदोबस्त करुन परतलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील सहा जवानांना कोरोना (कोविड-19)  लागण झाली,  यानंतर पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी प्रशासकीय यंत्रनेकडुन परिस्थीतीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोनाचा समुह संपर्क होणार नाही यादृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सुचना देताना, जिल्ह्यात सामान्य रुग्णालयातुन एक कोरोना ग्रस्त रुग्ण ठणठणीत बरा झाला असेच हे ही जवान कोरोनाला हरवतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
 कोरोना विरुध्द लढ्यात नागरीकांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व सुजाण नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही  त्यांनी केले. 
****

22 April, 2020

राज्य राखीव पोलीस दलातील सहा जवानांना कोरोनाची लागण, तर सारीने एकाचा मृत्यू


·   सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर.
·   नागरिकांनी घाबरुन न जाता घरीच थांबून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे
                                           -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास
हिंगोली दि.22: कोरोनाचा (कोवीड-19) प्रादूर्भाव प्रतिबंध आणि उपाययोजना संदर्भात हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. येथील राज्य राखीव पोलीस दलातील सहा जवानांना कोरोना (कोविड-19) ची लागण झाली आहे. तर एका व्यक्तीचा सारीने मृत्यू झाला असुन, त्याचा थ्रोट स्वॅब नमुना तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे पाठविण्यात आला आहे.
कोरोना बाधीत रुग्ण हे सर्व जण हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्र. 12 चे जवान असून यातील 01 रुग्ण हा मुंबई येथे तर 05 रुग्ण हे मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. या जवानांना येथील एसआरपीएफ हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिममार्फत औषधोपचार सुरु आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन, सद्यस्थीतीत त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना संशयीतांसाठी तयार करण्यात आलेल्या हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि एसआरपीएफ हॉस्पीटल तसेच वसमत, कळमनुरी, औंढा, आणि सेनगाव येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत दाखल  करण्यात आलेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
यामध्ये हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये आतापर्यंत 96 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 17 रुग्ण भरती असून, त्यांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 79 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच वसमत येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 102 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 92 रुग्ण भरती असून, 46 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 56 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल निगेटीव्ह आला असून, 10 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कळमनुरी येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 54 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. हे सर्व रुग्ण भरती असून, 06 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 48 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल निगेटीव्ह आला आहे. औंढा येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 22 रुग्णांना दाखल करण्यात आले असुन हे सर्व रुग्ण भरती आहेत. त्यापैकी 20 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत असुन 02 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल निगेटीव्ह आला आहे. सेनगाव येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 38 रुग्णांना दाखल करण्यात आले असून हे सर्व रुग्ण भरती आहेत. या 38 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर हिंगोली येथील एसआरपीएफ हॉस्पीटलमध्ये आतापर्यंत 194 रुग्णांना दाखल करण्यात आले असून, हे सर्व रुग्ण भरती आहेत. त्यापैकी 93 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 06 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा ‘पॉझिटीव्ह’ आला असून 95 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल निगेटीव्ह आला आहे.
यानुसार हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 506 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 417 रुग्ण भरती असून, 220 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 06 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून 280 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. 89 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री वर्षाताई गायकवाड आणि जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासन यंत्रणा ही योग्य समन्वयाने हिंगोलीकरांसाठी कार्यरत असुन, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांनी देखील घाबरुन न जाता आपली आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच सर्व सुजाण नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी जनतेला आवाहन केले आहे.             ****

21 April, 2020

शासनाकडून बांधकाम कामगाराना प्रत्येकी दोन हजाराचे अर्थसहाय्य कामगाराच्या खात्यात डी.बी.टी. पध्दतीने जमा होणार


शासनाकडून बांधकाम कामगाराना प्रत्येकी दोन हजाराचे अर्थसहाय्य
कामगाराच्या खात्यात डी.बी.टी. पध्दतीने जमा होणार

हिंगोली, दि.21 : राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बांधकाम कामगाराच्या खात्यात दोन हजार रुपये सरकार कडुन जमा केले जाणार आहेत. लॉकडाऊन मुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद असून मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवलेली आहे. अशा परिस्थितीत कोरोना संकट काळात बांधकाम कामगाराच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
दरम्यान राज्यातील बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी  नोंदीत व सक्रीय( जिवीत ) असलेल्या बांधकाम कामगारांना रु. 2000 एवढे अर्थ सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या खात्यात डी.बी.टी. पध्दतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
                यामुळे हिंगोली जिल्हयात काही लोक (एजंट) तुम्हाला पैसे येणार आहेत, तुमचे कागदपत्र आमच्याकडे द्या असे सांगुन  बांधकाम कामगारांची फसवणुक करत आहेत. अशा प्रकारची व्यक्ती गांवांमध्ये किंवा बांधकाम कामगारास भेटल्यास त्याची तक्रार आपल्या जवळील पोलीस ठाण्यामध्ये देण्यात यावी. सदरील रक्कम ही कामगार आयुक्त मुंबई यांच्या मुख्यालयातुन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी शासन कोणतेही अर्ज / फॉर्म भरुन घेणार नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांनी दलालाच्या कोणत्याही भुल थापांना बळी पडु नये. लॉकडाऊनच्या काळात  सेफ डिस्टन्सचे  तंतोतंत  पालन करुन कोठेही गर्दी करु नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सरकारी कामगार अधिकारी (प्र.) तात्याराव कराड यांनी केले आहे.  
00000


20 April, 2020

एक दिवसा आड जिवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार. * जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याबाबतच्या आदेशात बदल



हिंगोली, दि.20: जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे.
खरीप हंगाम जवळ आल्याने यापूर्वी जिवनावश्यक वस्तुंच्या दूकानांना आदेश काढून एक दिवसा आड दूकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतू अद्ययावत अधिसुचनेत किराणामाला व भाजीपाला विक्री करणारे दूकाने सुरु करण्याबाबात मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी किराणामाल, भाजीपाला, दूध विक्री केंद्रे, परवानाधारक चिकन/मटन शॉप, बेकरी, स्वीट मार्ट, विक्री दूकाने दररोज सकाळी 9.00 ते दूपारी 1.00 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. सदर आदेश रद्द करुन जिवनावश्यक वस्तुंची खालील देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार एक दिवस आड किराणामाल, भाजीपाला, दूध विक्री केंद्रे, परवानाधारक चिकन/मटन शॉप, बेकरी, स्वीट मार्ट, विक्री दूकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक 21 एप्रिल, 2020 रोजी जिवनावश्यक वस्तुंची दुकाने बंद राहतील.  

अ.क्र.
दिनांक
वार
वेळ

1
22/04/2020
बुधवार



   सकाळी 09.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत

2
24/04/2020
शुक्रवार
3
26/04/2020
रविवार
4
28/04/2020
मंगळवार
5
30/04/2020
गुरुवार
6
02/05/2020
शनिवार
संबधीतांनी दि.  20 एप्रिल, 2020 पासुन दूकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सेनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दूकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नांव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक., दूकानदारांनी व त्याच्या सोबत काम करणाऱ्या कामगारांनी नेहमीच नाक आणी तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक राहणार आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये किमान एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घेवून त्यांच्यासाठी हात धुण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध ठेवावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखवेत. दररोज कामावर येणाऱ्या कामगारांची तपासणी थर्मल गनच्या सहाय्याने करावी. दूकानदारांनी कामगारासाठी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व हात धुण्यासाठी पाण्याची व साबणाची व्यवस्था योग्य ठिकाणी करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील यांची ही दक्षता घ्यावी. शासनाने ठरवुन दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योगधंद्याच्या ठिकाणी व परिसरामध्ये सामाजीक अंतराचे (Social Distance) पालन करावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावावेत. 
तसेच आदेशात देण्यात आलेल्या कालावधी वगळता इतर कालावधीमध्ये कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था, अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधीत आयोजक, आस्थापना मालक/चालक/व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आदेश दिल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****