22 April, 2020

राज्य राखीव पोलीस दलातील सहा जवानांना कोरोनाची लागण, तर सारीने एकाचा मृत्यू


·   सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर.
·   नागरिकांनी घाबरुन न जाता घरीच थांबून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे
                                           -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास
हिंगोली दि.22: कोरोनाचा (कोवीड-19) प्रादूर्भाव प्रतिबंध आणि उपाययोजना संदर्भात हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. येथील राज्य राखीव पोलीस दलातील सहा जवानांना कोरोना (कोविड-19) ची लागण झाली आहे. तर एका व्यक्तीचा सारीने मृत्यू झाला असुन, त्याचा थ्रोट स्वॅब नमुना तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे पाठविण्यात आला आहे.
कोरोना बाधीत रुग्ण हे सर्व जण हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्र. 12 चे जवान असून यातील 01 रुग्ण हा मुंबई येथे तर 05 रुग्ण हे मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. या जवानांना येथील एसआरपीएफ हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिममार्फत औषधोपचार सुरु आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन, सद्यस्थीतीत त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना संशयीतांसाठी तयार करण्यात आलेल्या हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि एसआरपीएफ हॉस्पीटल तसेच वसमत, कळमनुरी, औंढा, आणि सेनगाव येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत दाखल  करण्यात आलेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
यामध्ये हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये आतापर्यंत 96 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 17 रुग्ण भरती असून, त्यांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 79 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच वसमत येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 102 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 92 रुग्ण भरती असून, 46 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 56 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल निगेटीव्ह आला असून, 10 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कळमनुरी येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 54 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. हे सर्व रुग्ण भरती असून, 06 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 48 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल निगेटीव्ह आला आहे. औंढा येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 22 रुग्णांना दाखल करण्यात आले असुन हे सर्व रुग्ण भरती आहेत. त्यापैकी 20 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत असुन 02 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल निगेटीव्ह आला आहे. सेनगाव येथील क्वारंनटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 38 रुग्णांना दाखल करण्यात आले असून हे सर्व रुग्ण भरती आहेत. या 38 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर हिंगोली येथील एसआरपीएफ हॉस्पीटलमध्ये आतापर्यंत 194 रुग्णांना दाखल करण्यात आले असून, हे सर्व रुग्ण भरती आहेत. त्यापैकी 93 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 06 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा ‘पॉझिटीव्ह’ आला असून 95 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल निगेटीव्ह आला आहे.
यानुसार हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 506 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 417 रुग्ण भरती असून, 220 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 06 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून 280 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. 89 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री वर्षाताई गायकवाड आणि जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासन यंत्रणा ही योग्य समन्वयाने हिंगोलीकरांसाठी कार्यरत असुन, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांनी देखील घाबरुन न जाता आपली आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच सर्व सुजाण नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी जनतेला आवाहन केले आहे.             ****

No comments: