हिंगोली जिल्ह्यात एकुण 14
कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती स्थीर
-जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास
हिंगोली दि.28: सेनगाव येथील क्वारंटाईन
सेंटरमध्ये एका 05 वर्षीय बालकाला कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त
झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील आज रोजी राज्य राखीव बलातील एकूण 12 जवानांना
कोविड-19 ची लागण झाली आहे. यातील 02 जवान हे मुंबई येथे तर 10 जवान मालेगाव येथे
बंदोबस्तासाठी कार्यरत होते. तर 01
व्यक्ती जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आल्याने त्यास
कोविड-19 ची लागण झाली आहे. अशाप्रकारे हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधीत
रुग्णांची संख्या ही 14 झाली आहे.
सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात
कोविड-19 ची लागण झालेल्या हिंगोली व जालना येथील राज्य राखीव बलातील एकूण 12 जवान
तसेच जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आलेला 01 व्यक्ती असे
एकूण 13 तर सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटर मधील 01 रुग्ण असे एकूण 14 या सर्व
रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात
येत आहे. सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना
कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 982 रुग्णांना दाखल
करण्यात आले होते. त्यापैकी आज रोजी 694 रुग्ण भरती असून, 342 रुग्णांचा थ्रोट
स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 14 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून 626
व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. 288 रुग्णांना आतापर्यंत घरी
सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.
कोरोना विरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे
पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत
महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या
कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment