19 April, 2020

आजपासून जीवनावश्यक वस्तूंची दूकाने दररोज सुरु राहणार




हिंगोली, दि.19: जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे.
खरीप हंगाम जवळ आल्याने यापूर्वी जिवनावश्यक वस्तुंच्या दूकानांना आदेशा काढून एक दिवसा आड दूकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतू अद्ययावत अधिसुचनेत किराणामाला व भाजीपाला विक्री करणारे दूकाने सुरु करण्याबाबात मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी किराणामाल, भाजीपाला, दूध विक्री केंद्रे, परवानाधारक चिकन/मटन शॉप, बेकरी, स्वीट मार्ट, विक्री दूकाने दररोज सकाळी 9.00 ते दूपारी 1.00 या वेळेत सरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.  
संबधीतांनी दि.  20 एप्रिल, 2020 पासुन दूकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सेनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दूकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नांव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक., दूकानदारांनी व त्याच्या सोबत काम करणाऱ्या कामगारांनी नेहमीच नाक आणी तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक राहणार आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये किमान एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घेवून त्यांच्यासाठी हात धुण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध ठेवावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखवेत. दररोज कामावर येणाऱ्या कामगारांची तपासणी थर्मल गनच्या सहाय्याने करावी. दूकानदारांनी कामगारासाठी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व हात धुण्यासाठी पाण्याची व साबणाची व्यवस्था योग्य ठिकाणी करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील यांची ही दक्षता घ्यावी. शासनाने ठरवुन दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योगधंद्याच्या ठिकाणी व परिसरामध्ये सामाजीक अंतराचे (Social Distance) पालन करावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावावेत. 
तसेच आदेशात देण्यात आलेल्या कालावधी वगळता इतर कालावधीमध्ये कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था, अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधीत आयोजक, आस्थापना मालक/चालक/व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आदेश दिल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****

No comments: